आसनसंख्येचे अजब गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 09:11 PM2017-08-09T21:11:55+5:302017-08-09T21:12:08+5:30

कारमध्ये मागील आसनावर तीन प्रवासी बसू शकतात हे आरटीओचे व कार कंपन्यांचे गमित असले तरी कारच्या रुंदीवरच आपली निवड पक्की करा. कार आपण आपल्या कुटुंबीयांच्या आरामशीर प्रवासासाठीही घेत असल्याने ही नजरही आवश्यक आहे.

Aubhav Math | आसनसंख्येचे अजब गणित

आसनसंख्येचे अजब गणित

Next

कार घेताना त्यामधील आसनसंख्येचे गणित मात्र पाहिले जात नाही. कारमध्ये प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता ही ड्रायव्हरसह किती व्यक्ती त्यात बसू शकतात तो आकडा दिला जातो. मात्र कारच्या आकाराचा विचार काही फार गांभीर्याने केला जात नाही. वास्तविक कार ज्या आरामदायी प्रवासासाठी आपण घेत असतो, त्यात बसण्याची रचना लक्षात घेतो. त्यात आरामदायी बसणे म्हणजे लेगस्पेस किती हे पाहातो, पण अगदी छोटी हॅचबॅक घेतली तरी आसन व्यवस्थेमध्ये त्यावर सीटकव्हर कसे व कोणत्या प्रकारचे आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्या आसनावर बसल्यानंतर चार मिनिटांमध्ये आपण त्यात किती कम्पफर्ट आहे हे देखील ठरवून मोकळे होतो. पण या बरोबर चिकित्सकपणाची नजर व विचार काही त्या आसनाव्यवस्थेबाबत करीत नाही. किंबहुना यामुळे नंतर पस्तावणारे अनेकजण मग मोठ्या मोटारीचा वापर करण्यासाठी पुढे सरसावतात.

सर्वसाधारणपणे आज हॅचबॅक, सेदान व एसयूव्ही या तीन प्रकारच्या मोटारी बाजारात दिसून येत आहेत. काही एसयूव्हींना सातजणांची प्रवासी क्षमता असल्याचे सांगितले जाते कारण त्यामध्ये दुसऱ्या रांगेमागे तिसरी रांग छोट्या आकारात तर कधी बऱ्यापैकी आकारात तयार केलेली असते, त्या रांगेत तीनजण बसू शकतात असे गणित मांडलेले असते. हॅचबॅक व सेदानमध्ये ड्रायव्हरच्या आसनाची असणारी पुढची एक रांग असते. त्यामागे एक रांग असते व मागील रांगेमध्ये तीन प्रवासी क्षमता व पुढील रांगेत ड्रायव्हरसह दोनजण बसण्याची क्षमता असल्याचे दाखवले जाते. ते बरोबर आहे पण गंमत त्यामध्ये अशी दिसते की, छोटी हॅचबॅक घ्या वा मोठी सेदान घ्या त्यामध्ये प्रवासी बसण्याची क्षमता ही ड्रायव्हरसह पाचजणांची असल्याचे दाखवले जाते. अर्थात आरटीओ पासिंग तसे असल्याचीही नोंद असते. पण प्रश्न असा पडतो की, छोट्या वा मध्यम आकाराच्या सेदानमध्येही तीन जण मागच्या रांगेत बसू शकतात, ते तितके आरामदायीपणे बसू शकतात का? हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाला पडायला काही हरकत नाही. छोट्या आकाराच्या हॅचबॅकमध्ये मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तींची संख्या तीन असेल तर त्या तिघांनाही आरामदायीपणे बसता येत नाही, ही वस्तुस्थिती मान्य केली तर मग मोठ्या सेदानमध्येही तशी स्थिती असते का, तर नाही. याचे कारण सेदानची रूंदी जास्त असते. तेथील प्रवासी त्याच आकारमानाचे असतील तर मग ते हॅचबॅकमध्ये कसे काय आरामात बसू शकतील, हा प्रश्न विचारला तर तार्किकदृष्टीने सेदानची रुंदी मोठी आहे, हॅचबॅकची रुंदी कमी आहे, हे उत्तर मिळते. परंतु तसे असेल तर मग हॅचबॅकमध्ये मागील रांगेत तीन प्रवासी बसण्याचे गणित आरटीओने कोणत्या आधारावर मान्य केले आहे व हॅचबॅक उत्पादन करणाऱ्या कंपन्यानीही तशी आसनसंख्या कशी काय व कोणत्या तार्किक आधारावर मांडली. कायद्यातील तरतुदींचा आधार कदाचित यासाठी घेतला तरी सहज व सुलभ प्रवासासाठी मध्यम आकाराच्या व्यक्तींना छोटी काय मध्यम आकाराची हॅचबॅकही तशी आरामदायी अजिबात नाही. मुळात कार घेताना आपल्या कारमध्ये मागे बसणाऱ्या विशेशष करून आपल्या कुटुंबींयाचा विचारही करायला हवा. तसे केले नाही, तर कार घेूनही चेपून चोपून प्रवास करायला लावण्याची सक्ती त्यांच्य़ावर केली जाते, व त्याला कारणीभूत आपल्या कार खरेदी करतानाच्या निवडीतील चुकीचे असते. दुसरी बाब काही महाभाग तर आसनाच्या या स्थितीमधील संमत प्रवासी संख्येपेक्षाही जास्त प्रवासी नेत असतात, इतकेच नव्हे तर ते बिनदिक्कतपणे सांगतात प्रवास एकदम कम्पफर्टेबल झाला बरं का..? शेवटी या प्रवासी संख्येचा व कारच्या आणि आपल्या कारमध्ये मागे बसणाऱ्यांचा विचार करताना लॉजिक आपल्यालाच लावायचे असते, इतके कार निवडताना मनात पक्के करा.

Web Title: Aubhav Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.