Auto Expo 2018: UM Motorcycle ची जबरदस्त UM Renegade Thor बाइक, जाणून घ्या पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचे फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 01:25 PM2018-02-08T13:25:47+5:302018-02-08T13:27:57+5:30
ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पो 2018 च्या दुस-या दिवशी UM Motorcycle ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक गिअर बाइकवरुन पडदा उचलला आहे
नवी दिल्ली - ग्रेटर नोएडामध्ये आयोजित ऑटो एक्स्पो 2018 च्या दुस-या दिवशी UM Motorcycle ने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक गिअर बाइकवरुन पडदा उचलला आहे. कंपनीने या बाइकला THOR हे नाव दिलं आहे. कंपनीने भारतातील सर्वात पहिल्या इलेक्ट्रिक क्रूझर बाइकचा टीझर याआधी जारी केला होता. अद्याप या बाइकच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आलेली नाही. पण लवकरच UM Renegade Thor भारतातील रस्त्यांवर धावतना दिसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काय आहेत फिचर्स -
यूएम मोटर्सने भारतातील सर्वात पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाइक UM Renegade Thor मध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स दिला आहे. यामध्ये 30 किलोवॉटची पावरफूल मोटार देण्यात आलेली आहे.
या बाइकमध्ये पुढच्या बाजूला 41mm हायड्रोलिक सस्पेन्शन देण्यात आलं आहे, तर मागील बाजूला ट्वीन अॅडजस्टेबल शॉक्स देण्यात आले आहेत. यामुळे बाइक चालवताना अत्यंत कंफर्ट फील मिळेल.
बाइकमध्ये 17 इंच एलओइ फ्रंट रिम आणि 15 इंच एलओइचे रिअर रिम देण्यात आले आहेत. पेट्रोल बाइकला टक्कर देण्यासाठी कंपनीने Li-Po लीथिअम पॉलीमर हायपॉवर बॅटरीचा वापर केला आहे.
ही बॅटरी तीन वेगवेगळ्या रेंजमध्ये चार्ज होईल. फुल चार्ज केल्यास बाइक 270 किमीपर्यंत धावेल असा कंपनीचा दावा आहे. 40 मिनिटात 80 टक्के बॅटरी चार्ज होईल असाही कंपनीचा दावा आहे.