Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 09:09 AM2020-02-06T09:09:42+5:302020-02-06T09:13:37+5:30

Auto Expo 2020 : बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत.

Auto Expo 2020: Great Wall Motors Entry In India; will take over Talegaon General Motors Company | Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

Auto Expo 2020 : ग्रेट वॉल मोटर्सची भारतात एन्ट्री; तळेगावच्या जनरल मोटर्स कंपनीचा घेणार ताबा

Next
ठळक मुद्देAuto Expo 2020 बुधवारपासून सुरू झाला आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार लाँच, प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. हा एक्स्पो या कंपन्यांसाठी महत्वाचा आहे. बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत.

Auto Expo 2020 बुधवारपासून सुरू झाला आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार लाँच, प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. हा एक्स्पो या कंपन्यांसाठी महत्वाचा आहे. कारण भारतात वाहन उद्योग बदलाच्या लाटांवर स्वार झाला आहे. यातच काही चीनच्या कंपन्याही भारतात उतरणार आहेत. 150 किमींचा अजस्त्र डोलारा असलेल्या ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये एसयुव्ही आणि इलेक्ट्रीक कारच्या रेंजचे प्रदर्शन केले. 


बीएस ६ मुळे पेट्रोल, डिझेलच्या तसेच कारच्या किंमती वाढत चालल्या आहेत. याचबरोबर आखातातील युद्धसदृष्य स्थितीही इंधनाच्या किंमती गगणाला पोहोचत आहेत. अशावेळी एकच पर्याय समोर दिसत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. सरकारनेही याचा पिच्छा पुरविला आहे. मात्र, सध्याच्या कारच्या किंमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. पण चीनची सर्वात मोठी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स यंदा इलेक्ट्रीक कार Ora R1 भारतात लाँच करणार आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये तब्बल 351 किमीचे अंतर तोडणार आहे. तर या कारचा सर्वाधिक वेग 100 किमी प्रती तास असणार आहे. ओरा आर1 मध्ये 35 किलो वॉटची मोटार देण्यात आली आहे. भारतीय बाजारात ही कार 6.23 लाख ते ८ लाख रुपयांमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तसेच यावर सरकारकडून सबसिडीही मिळण्याची शक्यता आहे. 


बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार

भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार

तर,  Great Wall Motors ने Haval हा एसयुव्ही ब्रँड भारतीय बाजारात आणण्याचे ठरविले आहे. याच्या काही एसयुव्ही मॉडेल ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आल्या. हॅवल एफ७, हॅवल एफ७एक्स, हॅवल एफ५, हॅवल एच९, जीएमडब्ल्यू आयक्यू या गाड्या एक्स्पोमध्ये दाखविल्या. 


 

तळेगावमध्ये कंपनी स्थापन करणार
ग्रेट वॉल मोटर्स आणि जनरल मोटर्स यांनी १७ जानेवारी २०२० रोजी जनरल मोटर्स इंडियाच्या तळेगाव येथील कारखाना ताब्यात घेण्यासाठी करारनाम्यावर सह्या केल्या आहेत. या व्यवहारामुळे ग्रेट वॉल मोटर्सच्या भारतातील प्रवेशाचे नक्की झाले आहे. २०२०च्या दुसऱ्या सहामाहीत हा व्य़वहार पूर्ण होईल. ग्रेट वॉल मोटर्स या कारखान्यात ग्रेट वॉल अंतर्गत ईव्ही आणि एसयूव्ही मॉडेल्सचे उत्पादन सुरू करणार आहे. यामुळे या वर्षाच्या शेवटी यापैकी काही कार भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. 

Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही

बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार

 

Web Title: Auto Expo 2020: Great Wall Motors Entry In India; will take over Talegaon General Motors Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.