Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 04:07 PM2020-02-05T16:07:41+5:302020-02-05T16:09:38+5:30

Auto Expo 2020 : आज रेनॉल्टने पहिली इलेक्ट्रीक कार Renault K-ZE वरून पडदा हटविला आहे.

Auto Expo 2020: Renault's electric car arrives; It will run 350 km in single charge | Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

Auto Expo 2020 : रेनॉल्टची इलेक्ट्रीक कार आली; 350 किमी धावणार

Next

Auto Expo 2020 आजपासून सुरू झाला आहे. मारुतीसह अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार लाँच, प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. हा एक्स्पो या कंपन्यांसाठी महत्वाचा आहे. कारण भारतात वाहन उद्योग बदलाच्या लाटांवर स्वार झाला आहे. आज रेनॉल्टने पहिली इलेक्ट्रीक कार Renault K-ZE वरून पडदा हटविला आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये 350 किमी अंतर पार करते. 


Renault K-ZE ला 44 एचपीची मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 125 एनएमचा पीक टॉर्क तयार करते. यामध्ये 26.8 किलो व्हॉटची लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी अर्ध्या तासात 30 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. 


याचसोबत रेनॉल्टने MPV कार Renault Triber Easy-R AMT व्हर्जन दाखविले आहे. लवकरच या कारचे लाँचिंग केले जाईल. यामध्ये 1 लीटरचे इंजिन देण्यात येणार असून मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येही ही कार उपलब्ध असणार आहे. ही कार कंपनीने बीएस 6 इंजिनासह लाँच केली होती. मात्र, किंमतीमध्ये वाढ केली होती. 

Auto Expo 2020: टाटा मोटर्सकडे पाऊले वळू लागली; आहेत एका पेक्षा एक देखण्या एसयुव्ही

Auto Expo 2020 : बहुप्रतीक्षित Kia Carnival MPV आली; मध्यमवर्गाची लिमोझिनच जणू

मारुती तब्बल 17 कार दाखविणार; पेट्रोलवर 32 किमी धावणारी स्विफ्ट आणणार


दरम्यान, चीनच्या कंपन्यांनी 20 टक्के जागा  घेतली होती. मात्र, या स्टॉल्सवर चीनचे अधिकारी दिसून आले नाहीत. कोरोना व्हायरसचा परिणाम झाला असून कंपन्यांनी चीनमधील कर्मचाऱ्यांना पाठविलेले नाही. या स्टॉल्सवर चीनी कंपन्यांचे भारतीय कर्मचारी दिसून येत होते. तर भारतात आलेल्या 22 कर्मचाऱ्यांना चीनने मागे बोलावले आहे. 

Web Title: Auto Expo 2020: Renault's electric car arrives; It will run 350 km in single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.