Auto Expo : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:01 AM2023-01-14T09:01:18+5:302023-01-14T09:01:58+5:30

auto expo 2023 : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) डिलिव्हरी बॉईजची ही समस्या लक्षात घेऊन, एक उत्तम इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे, जी चालवण्यासाठी फक्त 5 पैसे प्रति किमी खर्च येतो.

auto expo 2023 electric bike corrit transit launched running cost 5p per km benefit for delivery boys | Auto Expo : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार!

Auto Expo : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार, कमी खर्चात 'ही' इलेक्ट्रिक बाइक धावणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्याचा काळात आपण दूध, भाजीपाला, अंडी ते रेशन आणि अन्नापर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीची होम डिलिव्हरी पसंत करतो. आपले हे काम डिलिव्हरी बॉईज/गर्ल्स पूर्ण करतात. ई-कॉमर्स कंपन्या आल्यानंतर होम डिलिव्हरी करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या झपाट्याने वाढल्या आहेत. पण महागलेले पेट्रोल त्यांच्या कमाईवर सूट म्हणून काम करते. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) डिलिव्हरी बॉईजची ही समस्या लक्षात घेऊन, एक उत्तम इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे, जी चालवण्यासाठी फक्त 5 पैसे प्रति किमी खर्च येतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया…

नोएडा स्थित कॉरिट इलेक्ट्रिकने (Corrit Electric) रस्त्यावरील विक्रेत्यांच्या तसेच डिलिव्हरीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ट्रान्झिट इलेक्ट्रिक बाइक आणली आहे. कंपनीने ही 3 कलरमध्ये आणली आहे. ही बाइक अनेक प्रकारे कस्टमाइज केली जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक बाइक 250 किलो वजन घेऊन धावू शकते. बाइकची खासियत म्हणजे त्याची मागील सीट कस्टमाइझ करण्यायोग्य आहे. खरेदी करणारे ग्राहक बाइकची मागील सीट काढू शकतात, जिथे ते डिलिव्हरी बॉक्स किंवा बॅग त्यावर बांधू शकतात. 

दुसरीकडे, रस्त्यावरील विक्रेते त्यांचा डोसा तव्यावर, खाद्यपदार्थांचे स्टॉल इत्यादी वस्तू मागच्या बाजूला ठेवू शकतात. कंपनीने ही बाइक अशा प्रकारे डिझाइन केली आहे की, मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या ती आपल्या डिलिव्हरी पार्टनरला देऊ शकतात. यामध्ये कंपन्यांना आपले ब्रँडिंग करण्यासाठी स्वतंत्र स्पेसही देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक बाइक 2.8 kW लिथियम आयन बॅटरीसह येते. ती सिंगल चार्जमध्ये 125 किमीपर्यंत रेंज देते. तसेच, पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास साडेतीन तास लागतात. बाइकचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. कंपनीकडून या बॅटरीवर 3 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. 

इसे फुल चार्ज होने में करीब साढ़े तीन घंटे का समय लगता है.

कंपनीची विक्रीनंतरची सेवा देशातील 50 शहरांमध्ये आहे. सध्या कंपनी या बाइकमध्ये फिक्स्ड बॅटरी देत ​​आहे. पण कंपनीचे संस्थापक मयूर मिश्रा यांनी सांगितले की, लवकरच यामध्ये रिमूव्हेबल बॅटरीचा ऑप्शनही उपलब्ध होईल. ही बॅटरी एका चार्जसाठी 3 युनिट वीज वापरते. अशा परिस्थितीत विजेचा दरही आठ रुपये प्रतियुनिट धरला, तर तो चालवण्याचा खर्च जवळपास 5 पैसे प्रतिकिमी इतका येतो.
    
बाइकची किंमत किती?
कंपनीच्या या बाइकची किंमत 85,000 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये फेम सबसिडीचा समावेश आहे, याचा अर्थ ती ऑन-रोड किंमत आहे. दुसरीकडे, जर ती ईएमआयवर खरेदी करायचे असेल, तर किमान 10 टक्के डाउनपेमेंट करून ग्राहक महिन्याला 4,000 रुपयांच्या हप्त्यावर खरेदी करू शकतात.

Web Title: auto expo 2023 electric bike corrit transit launched running cost 5p per km benefit for delivery boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.