Auto Expo 2023 : नवी हेक्टर राहिली बाजूला, MG च्या ‘या’ कारनं वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा जबरदस्त Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:51 IST2023-01-11T15:51:23+5:302023-01-11T15:51:36+5:30
Auto Expo 2023 : आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला दिल्लीत सुरूवात झाली आहे.

Auto Expo 2023 : नवी हेक्टर राहिली बाजूला, MG च्या ‘या’ कारनं वेधलं सर्वांचं लक्ष; पाहा जबरदस्त Photos
MG Motors ने ऑटो एक्स्पो 2023 च्या पहिल्या दिवशी त्यांच्या लोकप्रिय SUV Hector चे फेसलिफ्ट आणि फेसलिफ्ट प्लस मॉडेल लाँच केले. याची सुरुवातीची किंमत 14.73 लाख रुपये आहे. परंतु, एमजीच्या पॅव्हेलियनमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांची मिजेट कार. ही हिरव्या रंगाची कार कंपनीच्या पॅव्हेलियनच्या एंट्री पॉईंटवर होती. म्हणजेच आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर या गाडीवर थांबते. ही एक टू सीटर कार आहे. ही कार तुम्हाला त्या काळची आठवण करून देईल जेव्हा अशा कार लंडनच्या रस्त्यावर चालत असत.
मिजेटला पहिल्याच नजरेत बघितल्यावर विंटेज कारची आठवण होते. त्याच्या पुढच्या बाजूला एक ग्रिल आहे. ज्यामध्ये MG च्या लोगोसह दोन मोठे हॅलोजन बल्ब देण्यात आले आहेत. कारमध्ये बल्ब हेडलाइट्स देण्यात आले आहेत. हेडलाइट्सच्या खाली इंडिकेटर लाईट दिलेले आहेत. मागील बाजू अगदी फ्लॅट आहे. परंतु यात मोठी बुटस्पेस देण्यात आली आहे.
ही टू सीटर कार असल्यामुळे बूट स्पेस दुसऱ्या रांगेतूनच सुरू होते. कारला फक्त दोन दरवाजे उपलब्ध आहेत. आतील बाजूस, लाल लेदर फिनिशसह सीट्स आणि इंटीरियर्स मिळतात. कारमध्ये दुसऱ्या रांगेच्या जागी सामान ठेवण्यासाठी जागा देखील आहे.