‘पापा की परी'साठी खुश खबर; लॉन्च झाली अशी EV स्कूटर! पायांनी ब्रेक लावण्याची नाही गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:15 PM2023-01-14T18:15:23+5:302023-01-14T18:16:25+5:30
Self Balancing Scooter: मुंबई बेस्ड स्टार्टअप Liger Mobilityने ऑटो एक्सपोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.
Auto Balancing Electric Scooter for Girls: ऑटो एक्सपो 2023मध्ये एकापेक्षा एक अॅडव्हान्स टेक्नोलॉजी असलेल्या गाड्या पाहायला मिळाल्या. यातच एक्सपोमध्ये एक अशी स्कूटर पाहायला मिळाली, ज्याला बॅलेंस करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मेहनत घ्यावी लागणार नाही. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आजकाल स्कूटर किंवा स्कुटी चालक म्हणून आपण मुलींना/महिलांना पाहतो. आपल्या देशातील 'पापा की परीं'साठी ही Auto Balancing Scooter खूप फायद्याची ठरेल.
आपण अनेकदा पाहतो की, स्कूटरला बॅलेंस करण्यात तरुणींना खूप अडचणी येतात. सोशल मीडियावर अशाप्रकारची अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात तरुणी स्कूटरला नीट सांभाळू शकत नाहीत आणि अपघात होतो. त्यामुळे ही बॅलेंसिंग स्कूटर तरुणींसाठी अतिशय चांगला पर्याय असणार आहे. मुंबई बेस्ड स्टार्टअप Liger Mobility कंपनीने या ऑटो एक्सपोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर Liger X सादर केली आहे. ही स्कूटर पूर्णपणे मेड-इन-इंडिया आहे.
ऑटो-बॅलेंसिंग तंत्रज्ञान काम कसं करतं?
कंपनी गेल्या 6 वर्षांपासून या स्कूटर आणि टेक्नोलॉजीवर काम करत आहे. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेंसिंग टेक्निकचा वापर झाला आहे. हे ऑर्टिफिशिअल इंटीलिजेंस म्हणजेच AI बेस्ड टेक्निक आहे. ही टेक्नोलॉजी जायरोस्कोपिक प्रिंसिपल ऑफ फिजिक्सच्या सिद्धांतावर काम करते. यामुळे स्कूटर स्टेबल राहते आणि सेंसर्सच्या मदतीने पडत नाही.
स्कूटरमध्ये स्टँडची गरज नाही?
अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की, या अपकमिंग स्कूटरमध्ये साइड स्टँडची गरज असते की, नाही...? तर, ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर साइड स्टँड्ससह येते. कंपनीने सांगितले की, या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेंसिंग टेक्निक स्लो-स्पीडसाठी आहे. हाय-स्पीडवर असल्यावर स्कूटर ऑटोमॅटिक बॅलेंस करते. ही टेक्निक स्कूटर चालू असतानाच काम करते. बंद स्कूटरला उभं करण्यासाठी स्टँडची गरज असेल.