ही आहे जगातली सर्वात वेगवान ऑटो रिक्षा, गिनीज बुकमध्ये नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 11:44 AM2019-05-15T11:44:16+5:302019-05-15T11:48:49+5:30

ऑटो रिक्षामध्ये बसल्या बसल्या तुम्हीही ऑफिसला उशीर होऊ नये म्हणूण 'ओ...भाऊ जरा लवकर चला ना...' असं म्हटलं असेलच.

The auto rickshaw highest speed and set Guinness world record | ही आहे जगातली सर्वात वेगवान ऑटो रिक्षा, गिनीज बुकमध्ये नोंद!

ही आहे जगातली सर्वात वेगवान ऑटो रिक्षा, गिनीज बुकमध्ये नोंद!

Next

ऑटो रिक्षामध्ये बसल्या बसल्या तुम्हीही ऑफिसला उशीर होऊ नये म्हणूण 'ओ...भाऊ जरा लवकर चला ना...' असं म्हटलं असेलच. पण आता असं म्हणणाऱ्यांसाठी जगातला सर्वात वेगवान रिक्षा आला आहे. इतकेच नाही तर या रिक्षाने वेगाच्या बाबतीत गिनीज वर्ल्ड रिकॉर्डही केला आहे. या रिक्षाचं नाव टुक-टुक आहे. सर्वात वेगवान या रिक्षाचा वेग ११९ किलोमीटर प्रतितास आहे. 

एसेक्सचा रिक्षा



हा रिक्षा एसेक्स कंपनीचा आणला आहे. ही कंपनी यूकेची आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशिअल पेजवर ही माहिती शेअर केली आहे. या रिक्षाचं इंजिन १३०० सीसीचं आहे. आतापर्यंतच्या रिक्षापेक्षा सर्वात मोठं इंजिन या रिक्षाला लावण्यात आला आहे. 


एसेक्स बिझनेसमन मॅट एवरर्डची कंपनी आहे. ते म्हणाले की, त्यांना या उपलब्धीमुळे फार आनंद झाला आहे. सध्या टुक-टुक हा रिक्षा यूकेमध्ये चालतो. त्यामुळे आता भारतात ही रिक्षा जेव्हा येईल तेव्हाच याची स्पीड बघता येईल. 

Web Title: The auto rickshaw highest speed and set Guinness world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.