अर्टिगा, एक्सएल 6 बुकिंग केलेल्यांसाठी वाईट बातमी; मारुतीने अक्षरश: हात टेकलेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:18 PM2023-06-19T13:18:01+5:302023-06-19T13:18:18+5:30
मारुती सुझुकी एरिनाद्वारे अर्टिगा विकली जात आहे. तर नेक्साद्वारे एक्सएल ६ एमपीव्ही विकली जात आहे.
मारुती सुझुकी येत्या काळात एक प्रमिअम सात सीटर कार लाँच करणार आहे. परंतू, मारुतीच्या सध्याच्या दोन सात सीटर कार अर्टिगा, एक्सएल 6 ची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने या दोन्ही कारचे उत्पादन जवळपास कमी झाले आहे. यामुळे दोन्ही कारची मागणी जवळपास एक लाखावर गेली आहे. मारुतीच्याच एका बड्या अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे.
मारुती सुझुकी एरिनाद्वारे अर्टिगा विकली जात आहे. तर नेक्साद्वारे एक्सएल ६ एमपीव्ही विकली जात आहे. दोन्ही गाड्या सीएनजीमध्ये असल्याने दोघांनाही चांगली मागणी आहे. 2022-23 मध्ये अर्टिगाचे 1,27,679 यूनिट विकले गेले होते. तर XL6 चे 36,423 कार विकल्या गेल्या होत्या. परंतू, आता अर्टिगाचा वेटिंग पिरिएड हा ८ ते १० महिने झाला आहे. तर एक्सएल ६ साठी ग्राहकांना ४-५ महिने वाट पहावी लागत आहे.
यंदाही अर्टिगाला मोठी डिमांड आहे. अर्टिगाच्या सीएनजी व्हेरिअंटला जास्त मागणी आहे. मे २०२३ पर्यंत या कारसाठी 68,000 ऑर्डर वेटिंगवर होते. तर एकूण अर्टिगाची वेटिंग ही 1,21,000 युनिट होती. मारुतीचे सेल्स आणि मार्केटिंगचे एक्झिक्युटीव्ह संचालक शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, आता अर्टिगा मोठे कुटुंबच नाही तर छोटी कुटुंबे आणि युवा तरुणाई, ऑफिसला जाणारे देखील घेत आहेत.