बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:17 PM2022-07-25T16:17:55+5:302022-07-25T16:18:12+5:30

बजाज ऑटो लवकरच टू व्हीलर आणण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. एका वाहनासाठी कंपनीने रजिस्ट्रेशन केले आहे.

Bajaj Auto Dynamo Name Registered – New Motorcycle Or Electric Scooter? | बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल?

बजाज धमाका करण्याच्या तयारीत, डायनॅमो नावाने रजिस्ट्रेशन; इलेक्ट्रिक की पेट्रोल?

googlenewsNext

बजाजच्या मालकांनी काही महिन्यांपूर्वी ओलासारख्या कंपन्यांना आम्ही खाऊन टाकणार असे वक्तव्य केले होते. सध्या बजाजची एकमेव ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आहे. टीव्हीएसने नवीन अपग्रेड आणत रेंजच्याबाबतीत ओलाला टक्कर दिली आहे. असे असताना बजाज कंपनीने नवीन नावाचा पेटंट रजिस्टर केला आहे. 

बजाज ऑटो लवकरच टू व्हीलर आणण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. एका वाहनासाठी कंपनीने रजिस्ट्रेशन केले आहे. हे नाव बजाज डायनॅमो (Bajaj Dynamo) असे आहे. कंपनीकडून यावर कोणती ही माहिती देण्यात आलेली नाही. असे असले तरी नावावरून आणि रजिस्ट्रेशनच्या माहितीवरून मेकॅनिकल टू इलेक्ट्रीकल एनर्जीचा उल्लेख आहे. 

आता ही स्कूटर फ्युअल बेस्ड असेल की हायब्रिड ते माहिती नाहीय. तसेच ती टू व्हीलर असेल की थ्री व्हीलर याचीही माहिती आलेली नाही. बजाजच्या रिक्षा तुफान चालतात. यामुळे कदाचित कंपनी रिक्षा देखील इलेक्ट्रीकमध्ये आणण्याच्या तयारीत असू शकते. बजाज ने जिथे रजिस्ट्रेशन केले आहे, तो क्लास १२ आहे. यामध्ये आयसीई दुचाकी आणि इलेक्ट्रीक वाहन तसेच तीन चाकी वाहन यांचे रजिस्ट्रेशन केले जाते. 

डायनॅमो हा शब्द विजेशी संबंधीत आहे. यामुळे ही नवी दुचाकी स्कूटर नसून ती इलेक्ट्रीक पल्सर असून शकते असा अंदाजही बांधला जात आहे. कंपनी गेल्या काही काळापासून पल्सरला इलेक्ट्रीकमध्ये आणण्याची तयारी करत आहे. असे झाले तर इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारातील तो एक मोठा धमाका असेल. 

चेतकच्या किंमतीत वाढ
बजाजने खर्च वाढल्याचे सांगून बजाज चेतक या इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत वाढ केली आहे. याची किंमत एकाच झटक्यात 12,749 रुपयांनी वाढविली आहे. 1.41 लाख रुपयांवरून ही किंमत 1.54 लाख रुपये झाली आहे. 

Web Title: Bajaj Auto Dynamo Name Registered – New Motorcycle Or Electric Scooter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.