Bajaj Auto नं लाँच केली न्यू Pulsar 250; पाहा किंमत आणि काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 02:00 PM2022-03-02T14:00:45+5:302022-03-02T14:01:12+5:30

Bajaj Pulsar 250 मध्ये कंपनीनं गियर इंडिकेटर, यूएसबी मोबाइर चार्जिंग पोर्ट आणि असिस्ट, स्लिपर क्लचचा पर्याय दिला आहे. 

Bajaj Auto launches new Pulsar 250 See the price and whats special know features engine details | Bajaj Auto नं लाँच केली न्यू Pulsar 250; पाहा किंमत आणि काय आहे विशेष

Bajaj Auto नं लाँच केली न्यू Pulsar 250; पाहा किंमत आणि काय आहे विशेष

Next

बजाज ऑटोने (Bujaj Auto) भारतीय टू व्हिलर मार्केटमध्ये (Two Wheeler Market) आपली नवीन मोटरसायकल लाँच केली आहे. बजाज पल्सर 250 आता नव्या ब्लू कर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली. गेल्या वर्षी 2021 मध्ये बजाज पल्सर रेसिंग रेड आणि टेक्नो ग्रे या दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आली होती. आता कंपनीनं ब्लू कलर व्हेरिअंट लाँच केलं आहे. त्यामुळे आता ही बाईक तीन कलर व्हेरिअंटमध्ये खरेदी करता येणार आहे.

सध्या, या कलरची बाईक काही निवडक डीलरशिपवर उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळात आणखी डीलरशिपवर त्या उपलब्ध करून दिल्या जातील. सध्या तरूणांमध्ये ब्लू कलरचा मोठा ट्रेंड आहे. त्यामुळे तरुणाईकडे पाहता कंपनीनं ही बाईक आता निऑन ब्ल्यू कलरमध्ये लाँच केली आहे.

बजाज पल्सर 250 ब्लू कलर ऑप्शन बद्दल बोलायचे तर यात काही हायलाइट्स सह मोनोटोन फिनिश देखील मिळेल. ते राखाडी आणि पांढर्‍या रंगात उपलब्ध असेल. नवीन बाईकमध्ये मॅचिंग इंजिन कव्हरही मिळेल. बजाजने अद्याप आपल्या नवीन कलर व्हेरिएंटची किंमत जाहीर केली नसली तरी सध्याच्या मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 1.40 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

तर दुसरीकडे इंजिनबाबत सांगायचं झाल्यास यात 249.07 cc इंजिन देण्यात आले आहे. ते 24.5 PS पॉवर आणि 21.5 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर ते 5 गिअरबॉक्ससह येते.

Web Title: Bajaj Auto launches new Pulsar 250 See the price and whats special know features engine details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.