बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:14 IST2024-12-31T13:14:35+5:302024-12-31T13:14:54+5:30

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक मौल्यवान दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने ‘आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक’ ही फ्लॅगशिप ...

Bajaj Auto launches the best Chetak ever | बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक

बजाज ऑटोने लॉन्च केली आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक मौल्यवान दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने ‘आतापर्यंतची सर्वोत्तम चेतक’ ही फ्लॅगशिप ३५ सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज ३ व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असून, नवीन फ्लोअर बोर्ड बॅटरीज, नवीनतम तंत्रज्ञान आणि अतिरिक्त सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज आहे.

‘३५ सिरीज’ हे नाव ३.५ केडब्ल्यूएच क्षमतेच्या शक्तिशाली बॅटरीवरून देण्यात आले आहे. चेतक ३५०१, ३५०२ आणि ३५०३ असे ३ मॉडेल्स यात उपलब्ध आहेत. सोयीस्कर रायडिंग, मोठा बूट स्पेस आणि चार्जिंगसाठी कमीत कमी वेळ ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे रायडर्सना लांब अंतराचा प्रवास करता येतो, अधिक सामान वाहून नेता येते तसेच पुढील राइडसाठी लवकर तयार होणे शक्य होते.

बजाज ऑटोच्या अर्बनाइट बिझनेस युनिटचे अध्यक्ष एरिक वास यांनी सांगितले की, ‘ही फ्लॅगशिप सिरीज  तरुण रायडर्सना आकर्षित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली असून, यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि निओ-क्लासिक शैलीची सांगड घालण्यात आली आहे. आमच्या सर्वसमावेशक उत्पादन श्रेणीमुळे आता प्रत्येक रायडरसाठी एक चेतक उपलब्ध आहे.’ (वा. प्र.) 

महत्त्वाचे फीचर्स 
- एका चार्जवर १५३ किमीची सुधारित रेंज.
- ३ तासांत ०-८० टक्के चार्जिंग.
- ३५ लिटरचा अंडर-सीट स्टोरेज 
 

Web Title: Bajaj Auto launches the best Chetak ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.