Bajaj Auto लाँच करणार पहिलं पूर्ण इलेकट्रीक व्हेईकल; Pierer Mobility सोबत भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:34 PM2021-03-26T16:34:37+5:302021-03-26T16:36:06+5:30

ऑस्ट्रियातील Pierer Mobility ही युरोप स्ट्रीट बाईक्समधील सर्वात मोठी कंपनी आहे.

Bajaj Auto Pierer Mobility to launch electric vehicle in 2022 contract with Austrian company Pierer Mobility | Bajaj Auto लाँच करणार पहिलं पूर्ण इलेकट्रीक व्हेईकल; Pierer Mobility सोबत भागीदारी

Bajaj Auto लाँच करणार पहिलं पूर्ण इलेकट्रीक व्हेईकल; Pierer Mobility सोबत भागीदारी

Next
ठळक मुद्देऑस्ट्रियातील Pierer Mobility ही युरोप स्ट्रीट बाईक्समधील सर्वात मोठी कंपनी आहे.यापूर्वी बजाजानं केली होती ६५० कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा

Bajaj Auto लवकरच भारतात पूर्ण इलेक्ट्रीक व्हेईकल लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं शुक्रवारी युरोमधील नावाजलेली कंपनी  Pierer Mobility AG सोबत टू व्हिलर सेगमेंटमधील इलेक्ट्रीक प्रोडक्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. Bajaj Auto भारतात २०२२ मध्ये आपली पहिली इलेक्ट्रीक टू व्हिलर लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही कंपन्या केटीएम प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रीक स्कूटर, इलेक्ट्रीक मॉपेड आणि इलेक्ट्रीक सायकलवर काम करत आहेत. या दोन्ही कंपन्या हाय एन्ड इलेक्ट्रीक मोटरसायकलवरही काम करत आहेत.

Bajaj Auto आणि Pierer Mobility या गेल्या १५ वर्षांपासून भागीदार आहेत. त्यांनी केटीएम आणि नुकतीच लाँच केलेली Husqvarna ही मोटरसायकल भारत आणि निर्यात बाजारात विक्रीसाठी विकसित केली आहे. आता दोन्ही कंपन्यांनी बॅटरी इलेक्ट्रीक टू व्हिलरसाठीच्या विकासासाठी करार केला आहे. ही बाईक बजाज ऑटोच्या पुणे येथील प्रकल्पात तयार केल्या जातील.

यापूर्वी बजाजानं केली होती ६५० कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा

ऑस्ट्रियाची Pierer Mobility ही युरोपमधील स्ट्रीट बाईकची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, तर पुण्यातील बजाज ऑटो ही भारतातील दुसर्‍या क्रमांकाची टू व्हिलर उत्पादक कंपनी आहे. डिसेंबर २०२० मध्ये बजाज ऑटोनं पुण्यात नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याच ठिकाणी लेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेतलं जाईल. २०२२ मध्ये लाँच होणारी पहिली फुल्ली बॅटरी-इलेक्ट्रिक टू व्हिलर एक स्कूटर असेल. दोन्ही कंपन्या ३ ते १० किलोवॅट पॉवर रेंजमध्ये एक सामान्य ४८ व्होल्ट इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लॅटफॉर्म विकसित करित आहेत. पूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकल विकसित होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 

२०२० च्या सुरूवातील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश

२०२० च्या सुरुवातीला, बजाज ऑटोने इलेक्ट्रिक चेतक लाँच करून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश केला. चेतक ही युरोपियन बाजारात बाजारात लाँच करण्याचं नियोजनगी करण्यात आलं होतं. परंतु सुट्या भागांचा पुरवठा होत नसल्यामुळं ही योजना पुढे जाऊ शकली नाही.

Web Title: Bajaj Auto Pierer Mobility to launch electric vehicle in 2022 contract with Austrian company Pierer Mobility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.