Bajaj Chetak Electric Scooter: बजाजच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! आता 20 शहरांमध्ये उपलब्ध होणार 'चेतक'चे इलेक्ट्रिक व्हर्जन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 02:14 PM2022-02-18T14:14:33+5:302022-02-18T14:39:20+5:30

Bajaj Chetak Electric Scooter: बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचा वेटिंग पीरियड 4-8 आठवड्यांचा असून, कंपनीच्या वेबसाइटवरुन याला बूक करता येते.

Bajaj Chetak Electric Scooter: Good news for Bajaj fans! The electric version of 'Chetak' will now be available in 20 cities | Bajaj Chetak Electric Scooter: बजाजच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! आता 20 शहरांमध्ये उपलब्ध होणार 'चेतक'चे इलेक्ट्रिक व्हर्जन

Bajaj Chetak Electric Scooter: बजाजच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज! आता 20 शहरांमध्ये उपलब्ध होणार 'चेतक'चे इलेक्ट्रिक व्हर्जन

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शहरांच्या यादीत नवी दिल्ली, मुंबई आणि गोवा जोडून भारतातील आपले नेटवर्क दुप्पट केले आहे. आता या चेतक स्कूटरची विक्री एकूण 20 शहरांमध्ये होत आहे.

बजाजने यापूर्वी 2021 मध्ये चेतक इलेक्ट्रिकसाठी 8 शहरांमध्ये बुकिंग सुरू केली होती. 2022 मध्ये हा आकडा आणखी 12 शहरांपर्यंत वाढला, त्यात कोईम्बतूर, मदुराई, कोची, कोझिकोड, हुबळी, विशाखापट्टणम, नाशिक, वसई, सुरत, दिल्ली, मुंबई आणि मापुसा यांचा समावेश आहे. सध्या बजाज चेतक इलेक्ट्रिकसाठी प्रतीक्षा कालावधी 4-8 आठवडे आहे.

बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले, “चेतकचे यश पूर्णपणे चाचणी केलेल्या, विश्वासार्ह उत्पादनाच्या गुणवत्तेवर आधारित आहे. विक्री आणि सेवेचे वाढवलेले ऑन-ग्राउंड ग्राहकांची चिंता दूर करू शकते. चेतकच्या उच्च मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही येत्या काही आठवड्यात आमचे नेटवर्क आणखी वाढवण्याची योजना आखत आहोत."

किंमत आणि वैशिष्ट्ये
कंपनीच्या वेबसाइटवर सांगितल्याप्रमाणे बाजाजच्या या नवीन इलेक्ट्रिक चेतकची किंमत प्रीमियम व्हेरियंटसाठी रु. 1.45 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन चेतक अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही नवीन चेतक 3.8 kW इलेक्ट्रिक मोटरमधून 5 bhp आणि 16.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. शिवाय यात 3 kWh IP67 लिथियम-आयन बॅटरी पॅक येतो, जो एका चार्जवर 95 किमी (इको मोडमध्ये) ची श्रेणी आणि 70 किमी प्रतितास इतका उच्च वेग देतो. बजाज चेतक इलेक्ट्रिक सुमारे 6 ते 8 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
 

Web Title: Bajaj Chetak Electric Scooter: Good news for Bajaj fans! The electric version of 'Chetak' will now be available in 20 cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.