Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 01:52 PM2023-03-02T13:52:48+5:302023-03-02T13:53:45+5:30

बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं.

Bajaj Chetak New Premium Edition Launch Amazing Features in Electric Scooter price starts at rs 1 22 lakh | Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

googlenewsNext

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं. कंपनीनं ही स्कूटर आपल्या नवीन इलेक्ट्रीक व्हेइकल प्रोग्राम अंतर्गत लाँच केली आहे. नवीन प्रीमियम एडिशन बजाज चेतक लाँच करून, सध्याच्या मॉडेलची किंमत देखील अपडेट करण्यात आलीये. आता बजाज चेतक रेंजची सुरुवातीची किंमत 1,21,933 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. तर प्रीमियम एडिशन बजाज चेतकची किंमत 1,51,910 रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) पासून सुरू होते.

बजाज ऑटोने या स्कूटरच्या लाँचसोबतच नवीन ईव्ही प्रोग्रॅमची घोषणाही केली आहे. दुचाकी इलेक्ट्रीक वाहन पुरवठा साखळीची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि हा नवीन ईव्ही कार्यक्रम प्रमुख विक्रेत्यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आला आल्याची माहिती बजाज ऑटोनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलंय. कंपनीचा दावा आहे की हा नवीन कार्यक्रम दरमहा चेतकच्या 10,000 पेक्षा जास्त युनिट्सच्या उपलब्धतेची खात्री देत ​​नाही तर खर्च देखील कमी करतो. ज्यामुळे चेतक अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.

प्रीमिअम एडिशनमध्ये काय खास?
या नवीन एडिशनमध्ये चेतकला प्रीमियम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता ही स्कूटर तीन नवीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मॅट कोर्स ग्रे, मॅट कॅरिबियन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीने स्कूटरमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देखील जोडले आहेत. यात ऑल कलर एलसीडी कन्सोल जे वाहनाची माहिती सोयीस्करपणे दाखवतं. तर दुसरीकडे प्रीमियम टू-टोन सीट्स, बॉडी कलरचे रियर व्ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि मॅचिंग पिलियन फूटरेस्ट कास्टिंग हे स्कूटरचा क्लासिक लूक आणखी वाढवतात. हेडलॅम्प केसिंग, ब्लिंकर्स आणि सेंट्रल ट्रिम एलिमेंट्स आता चारकोल ब्लॅक थीमने सजवलेले आहेत.

दरम्यान, स्कूटरचं बुकिंग सुरू करण्यात आलं असून याची डिलिव्हरी एप्रिल महिन्यापासून केली जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. याचं बुकिंग तुम्ही डिलरशीप किंवा ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून करता येऊ शकेल.

Web Title: Bajaj Chetak New Premium Edition Launch Amazing Features in Electric Scooter price starts at rs 1 22 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.