'या' आहेत बेस्ट Electric Scooters; ९५ किलोमीटरची रेंज आणि प्रदूषणाचंही टेन्शन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 05:37 PM2021-06-06T17:37:21+5:302021-06-06T17:40:51+5:30
सध्या देशात वाढत आहे Electric वाहनांची मागणी. पाहा कोणत्या आहेत या स्कूटर्स आणि किती आहे किंमत.
सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तुलनेनं ही वाहनं पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा महाग असली तरी त्यांचा इंधना इतका पुढे खर्च नसतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी टळते. आपण पाहूया कोणत्या आहेत देशात बेस्ट 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स.
Ather 450X
ही सर्वोत्तम मेड इन इंडिया स्कूटर्सपैकी एक आहे. यामध्ये पॉवरफुल मोटरसह शार्प डिझाईन आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी मिळते. यात 6kW इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 8 bhp पॉवर आणि 26 एनएम टॉर्क देते. स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर ८५ किमीपर्यंत जाऊ शते. या स्कूटरचा टॉप स्पीड 85 kmph इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.47 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Bajaj Chetak
ही स्कूटर दिसण्यात अतिशय स्टायलिस्ट आहे तसंच याची क्वालिटीही उत्तम आहे. यामध्ये DRL सोबत LED हेडलँप, फुल डिजिटल LCD इन्स्टुमेंट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स मिळतात. बजाज चेतकमध्ये 3.8 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 5bhp पॉवर आणि 16.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ही स्कूटर एकदा चार्ज केल्या 95 किमीची रेंज देते. या याची एक्स शोरूम पुणे किंमत 1.42 लाख रूपये इतकं आहे.
TVS iQube
TVS iQube ही स्कूटर बजाज चेतकला टक्कर देणारी बाईक आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ऑल LED लायटिंग, TFT इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, युएसबी चार्जिंग, बूट लाईटही देण्यात आलं आली आहे. यामध्ये 4.4kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 6bhp ची पॉवर आणि 140Nm चा टॉर्क जनरेट करते. एका चार्जमध्ये ही स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत जाते. याची एक्स शोरूम दिल्ली किंमत 1.08 लाख रूपयांपर्यंत आहे.
Hero Optima
Hero Optima ही कंपनीची सर्वाधिक विक्री झालेल्या प्रोडक्टपैकी एक आहे. यामध्ये कंपनीनं डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, रिजनरेटीव्हग ब्रेकिंग, एलईडी हेडलँप, अँटी थेफ्ट अलार्म आणि पोर्टेबल बॅटरी दिली आर्हे. यामध्ये 1.2 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 1.34bhp पॉवर जनरेट करते. तसंच या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 42 किमी प्रति तास आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 82 किलोमीटर पर्यंत जाते. हीरो ऑप्टीमाची एक्स शोरूम दिल्ली किंमत 61,640 रूपये आहे.