ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:16 PM2024-05-03T16:16:34+5:302024-05-03T16:17:13+5:30

भारत आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल.

Bajaj CNG Bike: Bajaj's world's first CNG bike to be launched next month | ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

Bajaj CNG Bike: तुम्ही आतापर्यंत पेट्रोलवर चालणाऱ्या किंवा इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल ऐकले आहे. पण, आता लवकरच भारतात CNG वर चालणारी बाईक येणार आहे. देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Bajaj लवकरच जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या बाईकची चर्चा सुरू होती. पण, आता या बाईकची लॉन्चिंग डेट समोर आली आहे. बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. 

बाईक कधी लॉन्च होणार?
भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक येत्या 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाईल. आज नवीन Pulsar NS400 लॉन्चिंग सोहळ्यात राजीव बजाज यांनी ही माहिती दिली. या नवीन CNG बाईकचे नाव ब्रुझर 125 सीएनजी ( Bruzer 125 CNG) असेल. यासाठी बजाजने 2016 सालीच 'ब्रुझर' नावासाठी ट्रेडमार्क दाखल केला होता. आता येत्या जून महिन्यात ही बाईक लॉन्च होत आहे.  पुढील काही वर्षांत आणखी सीएनजी मॉडेल्स लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह Bajaj Pulsar चे नवीन मॉडेल लॉन्च, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!

दरम्यान, Bajaj ची नवीन Bruzer 125 कशी असेल, यात कोणते फिचर्स मिळतील, याची किंमत काय असेल, याबाबत कुठलाही तपशील कंपनीने जाहीर केलेला नाही. एका अंदाजानुसार, ही बाईक सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केली जाऊ शकते. विशेष म्हणजे, अनेकदा बजाजची एक आगळीवेगळी बाईक चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे. याक्षणी जगात कुठेही CNG बाईक उपलब्ध नाही, त्यामुळे बजाजची बाईक जगातील पहिली सीएनजी बाईक असेल. 
 

Web Title: Bajaj CNG Bike: Bajaj's world's first CNG bike to be launched next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.