फक्त रु. 10 हजारात घरी आणा 70 kmpl मायलेज देणारी दमदार बाईक; EMI फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:08 PM2024-12-03T16:08:06+5:302024-12-03T16:09:02+5:30

Bajaj CT 110X Bike on EMI: तुम्ही कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर ही बाईक तुमच्या कामाची आहे.

Bajaj CT 110X Bike : Bring home 70 kmpl mileage bike Only for Rs. 10k; EMI only | फक्त रु. 10 हजारात घरी आणा 70 kmpl मायलेज देणारी दमदार बाईक; EMI फक्त...

फक्त रु. 10 हजारात घरी आणा 70 kmpl मायलेज देणारी दमदार बाईक; EMI फक्त...

Bajaj CT 110X Bike on Down Payment and EMI : आज बहुतांश लोक ऑफिसला जाण्यासाठी किंवा खासगी कामांसाठी टू-व्हिलरचा उपयोग करतो. कुणी बाईक वापरतो तर कुणी स्कूटर. पण, पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आणि महागाईमुळे अनेकांना बाईक घेणेही परवडत नाही. चिंता करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला एका एशा बाईकबद्दल सांगणार आहोत, जी जास्त मायलेज देण्यासोबतच कमी किमतीत मिळते. 

आज बाजारात अनेक कंपन्यांच्या बाईक उपलब्ध आहेत. पण, यात सर्वाधिक मायलेजच्या बाबतीत Bajaj प्लॅटिना आणि सीटी110 एक्सचा कुणी सामना करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला बजाजच्या Bajaj CT 110X बाईकविषयी सांगणार आहोत. तुम्ही अतिशय कमी डाऊन पेमेंट अन् EMI भरुन ही बाईक खरेदी करू शकता. सामान्यातला सामान्य व्यक्तीदेखील याद्वारे आपले बाईक घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. 

किती डाउन पेमेंट भरावं लागेल?
Bajaj CT 110X च्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे, तर मुंबईत याची ऑन-रोड किंमत सुमारे 85 हजार रुपये आहे. जर तुम्ही 10 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले, तर तुम्हाला सुमारे 75 हजार रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज 9.7 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा फक्त 2400 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. 

बजाज सीटी 110X कशी आहे?
बजाज सीटी 110 एक्समध्ये 115.45 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन मिळते, जे 7000 rpm वर 8.6 PS पॉवर आणि 5000 rpm वर 9.81 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करू शकते. हे 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. याचा कमाल वेग ताशी 90 किलोमीटर आहे. तसेच, ही बाईक मॅट वाइल्ड ग्रीन, इबोनी ब्लॅक रेड आणि इबोनी ब्लॅक ब्लू, या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Bajaj CT 110X Bike : Bring home 70 kmpl mileage bike Only for Rs. 10k; EMI only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.