नवा अंदाज, नवे फिचर्स अन् स्वस्तात मस्त! Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:41 AM2022-11-16T11:41:00+5:302022-11-16T11:45:35+5:30

Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition: बजाज ऑटो कंपनीनं आपली सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक असलेल्या बजाज पल्सरची Pulsar 125 Carbon Fiber Edition लॉन्च केली आहे.

bajaj pulsar 125 carbon fibre edition launch check price features | नवा अंदाज, नवे फिचर्स अन् स्वस्तात मस्त! Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत...

नवा अंदाज, नवे फिचर्स अन् स्वस्तात मस्त! Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition लॉन्च, जाणून घ्या किंमत...

Next

Bajaj Pulsar 125 Carbon Fibre Edition: बजाज ऑटो कंपनीनं आपली सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक असलेल्या बजाज पल्सरची Pulsar 125 Carbon Fiber Edition लॉन्च केली आहे. या नव्या एडिशनची बाइक दोन पर्यायात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात सिंगल सीट व्हर्जन आणि स्प्लिट सीट व्हर्जन पाहायला मिळणार आहे. नव्या पल्सरची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात. नवी बजाज पल्सर १२५ कार्बन एडिशन ब्लू आणि रेड अशा दोन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. बाइकच्या डिझाइनमध्ये काही ग्राफिक्स देखील पाहायला मिळणार आहेत. बॉडी ग्राफिक्समध्ये हेडलॅम्प काऊल, फ्रंट फेंडर, फ्लुअर टँक, टेल सेक्शन आणि बेली पॅन इत्यादींचा समावेश असणार आहे. 

फीचर्स
सस्पेंशनसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि रिअरमध्ये ड्युअर शॉक एब्जॉर्बर देण्यात आले आहेत. ब्रेकिंग परफॉर्मेंसबाबत बोलायचं झालं तर फ्रंट डिस्क ब्रेक 240mm आणि रिअरसाठी ड्रम ब्रेक युनिट मिळणार आहे. ही अत्याधुनिक बाइक ६ स्पोप अलॉय व्हील्ससह लॉन्च करण्यात आली आहे. 

बाइकच्या दोन्ही एडिशनमध्ये क्लासिक पल्सर डिझाइनसह मस्क्युलर फ्यूल टँक, सिंगल-पोड हेडलॅम्प, ब्लॅकआऊट साइड स्लंग एग्जॉस्ट आणि स्प्लिट ग्रॅब रेल्स देण्यात आले आहेत. तसंच बाइकमध्ये १२४.४ सीसीचं सिंगल-सिलेंडर, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे की जे 8500rpm वर 11.64bhp आणि 6500rpm वर 10.8Nm चं पीक टॉर्क जनरेट करते. ही बाइक ५ स्पीड गीअरबॉक्ससह बाजारात दाखल करण्यात आली आहे. 

किंमत किती?
सिंगल सीट व्हर्जनची किंमत ८९ हजार २५४ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर स्प्लिट सीट व्हर्जन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ९१ हजार ६४२ रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) खर्च करावे लागणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Pulsar 125 Neon Edition देखील लॉन्च केली गेली होती. या बाइकची सुरुवातीची किंमत ८७ हजार १४९ रुपये इतकी आहे. 

Web Title: bajaj pulsar 125 carbon fibre edition launch check price features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.