धूम स्टाईल! Bajaj Pulsar 180 BS6 लाँच झाली; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 05:45 PM2021-02-19T17:45:52+5:302021-02-19T17:48:34+5:30

Bajaj Pulsar 180 On road price: 2021 Bajaj Pulsar 180 ब्लॅक अँड रेड रंगात ही बाईक उपलब्ध झाली आहे. बाईकच्या लुकमध्ये काही बदल पाहण्यास मिळत आहेत. ही बाईक मुंबईतील एका डिलरशीपकडे डिस्प्लेसाठी दाखल झाली असून ग्राहकही या बाईकची टेस्ट ड्राईव्ह करत आहेत. 

Bajaj Pulsar 180 BS6 launched in India; see features and Price | धूम स्टाईल! Bajaj Pulsar 180 BS6 लाँच झाली; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

धूम स्टाईल! Bajaj Pulsar 180 BS6 लाँच झाली; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

googlenewsNext

स्वदेशी दुचाकी वाहन निर्माता कंपनी Bajaj Auto (बजाज ऑटो)ने आज भारतीय बाजारात Pulsar 180 (पल्सर 180) लाँच केली आहे. या बाईकमध्ये बीएस-6 चे इंजिन देण्यात आले आहे. सध्या ही बाईक एकाच रंगात उपलब्ध करण्यात आली आहे. (Bajaj Auto launched Bajaj Pulsar 180 BS6 at 1,04,768 rs. )


2021 Bajaj Pulsar 180 ब्लॅक अँड रेड रंगात ही बाईक उपलब्ध झाली आहे. बाईकच्या लुकमध्ये काही बदल पाहण्यास मिळत आहेत. ही बाईक मुंबईतील एका डिलरशीपकडे डिस्प्लेसाठी दाखल झाली असून ग्राहकही या बाईकची टेस्ट ड्राईव्ह करत आहेत. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे


नव्य़ा पल्सरमध्ये काही बाहेरून बदल करण्य़ात आले आहेत. मात्र, मॅकेनिकल काहीच बदललेले नाही. नव्या 2021 Bajaj Pulsar 180 सेमी फेयर्ड Pulsar 180F वाले इंजिन देण्यात आले आहे. नव्या बाईकमध्ये बीएस-6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 178.6 cc सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 16.7 PS आणि 6,500 rpm वर 14.52 Nm चे टॉर्क देते. 5-स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकचे वजन 145 किलो आहे. जी सेमी फेयर्स मॉडेलच्या तुलनेत 10 किलोने हलकी आहे. 

कंपनीनं लॉन्चपूर्वीच जारी केलं Skoda Kushaq चं स्केच, Hyundai Cretaला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत


ट्विन डीआरएल देण्यात आले असून सिंगल-पॉड हेडलाइट दिली आहे. हेडलँप युनिटमध्ये टिंटेड फ्रंट मेन वाइजर देण्यात आला आहे. बल्ब इंडिकेटरसोबत हॅलोजन हेडलँप देण्यात आला आहे. मागे एलईडी टेललँप देण्यात आली आहे. सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एनालॉग टैकोमीटर आणि एक एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये स्पीड, फ्यूल लेव्हल आणि ओडोमीटर देण्यात आला आहे.  


पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स देण्यात आले असून मागे पाच प्रकारचे अॅडजस्टेबल गॅस चार्ज्ड शॉक्स देण्यात आले आहे. ब्रेकिंगसाठी 280 मिमी फ्रंट डिस्क आणि 230 मिमी रियर डिस्क देण्यात आली आहे. ब्रेक सिंगल चॅनेल ABS सोबत काम करतात. 

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...


किंमत 
2021 Bajaj Pulsar 180 ची मुंबईतील एक्स शोरुप किंमत 1,04,768 रुपये आहे. पल्सर 180F पेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त आहे. या बाईकची किंमत 1,14,003 रुपये आहे. 

Web Title: Bajaj Pulsar 180 BS6 launched in India; see features and Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.