अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 08:17 PM2020-01-16T20:17:18+5:302020-01-16T20:17:59+5:30

काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे.

Bajaj Pulsar electric motorcycle Made in Rs 1 lakh | अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

Next

बजाज या पुण्यात पसारा असलेल्या कंपनीने नुकतीच इलेक्ट्रीक स्कूटर चेतक लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे. मात्र, पल्सरही इलेक्ट्रीक मिळाली तर. ती ही एक लाखात. होय एका अवलियाने जुनी पल्सर इलेक्ट्रीकमध्ये बदलली आहे. 


काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे. मात्र, अन्य कंपन्यांची बाईक अद्याप आलेली नाही. सारे इलेक्ट्रीक स्कूटरमध्येच लक्ष देत आहेत. मात्र, बेंगळुरूच्या एका तरुणाने त्याची 150 सीसीची पेट्रोल इंजिनवाली पल्सर इलेक्ट्रीक केली आहे. 
Barrel Electric या स्टार्टअप कंपनीने ही बाईक बनविली आहे. सध्या ही बाईक 90 किमी प्रती तासाच्या वेगाने धावू शकते. त्यांना ही बाईक तब्बल 300 किमीच्या वेगाने पळण्यासाठी सक्षम करायची आहे. 


Barrel Exhaust चे कार्यकारी अधिकारी गिरिधर सुंदरराजन यांनी या इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर केलेल्या पल्सरचे रोड टेस्ट रिपोर्ट जाहीर केले आहेत. ही मोटारसायकल त्यांच्याच मालकीची आहे. त्यांनी काही वर्षे वापरल्यानंतर या बाईकला नवीन आयुष्य दिले आहे. यासाठी त्यांना 1 लाखांचा खर्च आला आहे. 


या पल्सरची इंधन टाकीच त्यांनी काढून टाकली आहे. यामुळे पाहताना ही बाईक काहीशी विचित्र वाटते. एका चार्जिंगमध्ये ही कार 80 किमी अंतर कापते. तर इकॉनॉमी मोडवर 100 किमी धावू शकते. ली आयनची बॅटरी एका चार्जिंगसाठी अडीच तासांचा वेळ घेते. 

Web Title: Bajaj Pulsar electric motorcycle Made in Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.