१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 07:31 PM2024-10-13T19:31:04+5:302024-10-13T19:31:49+5:30
Bajaj Pulsar N125 : बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Bajaj Pulsar N125 : नवी दिल्ली : बजाज ऑटो आपली नवीन पल्सर भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची शक्यता आहे. ही बाईक या फेस्टिव्ह सीझनमध्ये 16 ऑक्टोबर रोजी लाँच केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, ही नवीन बाईक बजाज पल्सर एन १२५ (Bajaj Pulsar N125) असू शकते. कंपनीच्या एन सीरिजनं बाजारात यश मिळवलं आहे. तसंच, या सीरिजमधील बाईक्स सर्वात परवडणाऱ्या कॅटगरीतील आहेत.
बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कमी कॅपेसिटीची असू शकते. हिंदुस्तान टाइम्सनुसार, हे पल्सर एन१२५ असू शकते. बजाजच्या या नवीन बाईकमध्ये प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्पसह एलईडी डीआरएल मिळू शकतात. याशिवाय बाईकमध्ये ट्विन-स्पोक अलॉय व्हील्स देखील दिले जाऊ शकतात.
फीचर्स...
बजाज पल्सर एन१२५ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल बसवण्यात आले असल्याची शक्यता आहे. कंपनी या बाईकमध्ये स्प्लिट सीट देऊ शकते. बाईकच्या मागील बाजूस एलईडी दिवे देखील असतील. तसेच, ही नवीन बजाज पल्सर १२५ सीसी, सिंगल सिलिंडर मोटरसह येऊ शकते, जी ५-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेली असू शकते. सिंगल-चॅनल ABS या बाईकच्या टॉप व्हेरिएंटमध्ये मिळू शकते.
ही बाईक कोणाला टक्कर देणार?
भारतीय बाजारात बजाज पल्सर १२५ डिस्कची एक्स-शोरूम किंमत ९२,८८३ रुपयांपासून सुरू होते. ही बाईक एन सीरिजमध्ये आली तर तिचे नवीन मॉडेल कोणत्या रेंजमध्ये बाजारात येईल हे पाहावे लागेल. बजाज पल्सर एन १२५ लॉन्च होताच अनेक बाईकशी टक्कर देऊ शकते. ही बाईक Hero Xtreme 125R, TVS Raider 125 आणि Bajaj Freedom 125 CNG ला टक्कर देऊ शकते.