Bajaj ची नवी Pulsar 125 लॉन्च, डिझाइन पाहून प्रेमात पडाल! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:01 PM2022-11-15T20:01:39+5:302022-11-15T20:03:13+5:30
ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
बजाज ऑटोसाठी पल्सर ही एक सर्वाधिक यशस्वी ठरलेली बाइक आहे. कंपनीकडे 125 सीसी ते 250 सीसी पर्यंतच्या अनेक पर्यायांमध्ये पल्सर उपलब्ध आहे. आता कंपनीने पल्सरमध्ये आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बजाज ऑटोने Pulsar 125 ची नवीन कार्बन फायबर एडिशन लॉन्च केली आहे. या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिचा लुक. तर जाणून घेऊयात या बाईकच्या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत सर्वकाही.
नवे कार्बन फायबर एडिशन दोन व्हर्जन- सिंगल-सीट आणि स्प्लिट मध्ये आणण्यात आले आहे. ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बजाज पल्सर 125 कार्बन फायबर सिंगल-सीट एडिशनच किंमत 89,254 रुपये एवढी आहे. तर स्प्लिट-सीट एडिशनची किंमत 91,642 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे.
असा आहे बाईकचा लुक -
कंपनीने दोन्ही कलर ऑप्शनसह ब्लॅक कलरच्या बेस पेंटचा वापर केला आहे. हेडलाइट काऊल, फ्यूल टँक, इंजिन काऊल, रिअर पॅनल आणि अलॉय व्हील स्ट्राइप्सवर ग्राफिक्स देण्यात आले आहे. कंपनीने फ्रंट फेंडर, टँक आणि रिअर काउलवर कार्बन फायबर ग्राफिक्स जोडले आहे. यात आकर्षक 3D लोगो, नियॉन हेडलाइट्स आणि काळ्या रंगाचे अलॉय व्हीलचा समावेश आहे.
इंजिन आणि पॉवर -
नवी बजाज पल्सर 125 सिंगल पॉड हेडलॅम्प यूनिटसह ट्विन डे-टाइम रनिंग लाइट्स, मस्क्युलर फ्यूल टँक आणि साइड-स्लंग एग्झॉस्टसह येते. या दुचाकीला 124.4cc, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8,500rpm वर 11.64bhp पॉवर आणि 6,500rpm वर 10.80Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. बाइकच्या फ्रंटला 240mm डिस्क आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. पल्सर 125 चा ग्राउंड क्लिअरन्स 165mm आणि कर्ब वेट 142kg आहे.