Tata Motors: टाटा मोटर्सची जबरदस्त स्कीम! शेतकरी, पेन्शन धारकांना कमी व्याजदराने कार देणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:17 PM2021-08-16T17:17:46+5:302021-08-16T17:19:46+5:30

Tata Motors cars loan Scheme: टाटा मोटर्सची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मान्सून धमाका ऑफरद्वारे ही कर्ज प्रक्रिया केली जाणार आहे.

Bank of Maharashtra to finance Tata Motors cars; 7.15% interest for farmers, Pensioners | Tata Motors: टाटा मोटर्सची जबरदस्त स्कीम! शेतकरी, पेन्शन धारकांना कमी व्याजदराने कार देणार 

Tata Motors: टाटा मोटर्सची जबरदस्त स्कीम! शेतकरी, पेन्शन धारकांना कमी व्याजदराने कार देणार 

googlenewsNext

सुरुवातीच्या अपयशानंतर वेगाने प्रगती करणाऱ्या आणि देशातील चौथी सर्वात मोठी ऑटो कंपनी बनलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी व्याजदराची आणि कमी डाऊनपेमेंटची ऑफर आणली आहे. यासाठी टाटा मोटर्सने बँक ऑफ महाराष्ट्रसोबत (Bank of Maharashtra) हातमिळवणी केली आहे. टाटा मोटर्स काही अटींवर ग्राहकांना 7.15% व्याजापासून कर्ज देणार आहे. हे व्याज रेपो रेटनुसार असणार आहे. (Tata Motors collaborates with Bank of Maharashtra for car loan scheme)

XUV 700 महिंद्राचेच नुकसान करणार; स्कॉर्पिओ सोबतही असेच घडलेले

कार्पोरेट ग्राहकांना कारच्या किंमतीच्या 80 टक्के कर्ज मिळणार आहे. या प्लॅननुसार पेन्शन मिळविणारे कर्मचारी, स्वत:चा स्टार्टअप खोलणारे, प्रोफेशनल, बिझनेस मॅन आणि शेतकऱ्यांना कारच्या एकूण किंमतीच्या (ऑन रोड) 90 टक्के कर्ज दिले जाणार आहे. कार्पोरेट ग्राहकांना 80 टक्के कर्ज दिले जाईल. 

Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...

टाटा मोटर्सची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. मान्सून धमाका ऑफरद्वारे ही कर्ज प्रक्रिया केली जाणार आहे. नव्या ग्राहकांना 7 वर्षांसाठी प्रति लाख 1517 रुपये सुरुवात विशेष EMI चा पर्याय देण्यात येणार आहे. कार्पोरेट कर्ज घेणाऱ्यांना आणि कार्पोरेट सॅलरी अकाऊंटवाल्यांना रिटर्नमेंट ऑफ इंटरेस्ट (ROI) मध्ये 0.25 टक्के सूट दिली जाणार आहे. 

Ola vs Simple One: सिंपल वनने ओला इलेक्ट्रीक स्कूटरला किंमत, रेंजमध्ये पछाडले; जाणून घ्या दोन्हींतील फरक...

टाटाच्या नेक्सॉनला तुफान मागणी आहे. यानंतर टाटा सफारीने ग्राहकांच्या मनात घर केले आहे. टाटा टियागो, टिगॉर, नेक्स़ॉन ईव्ही, हॅरिअर तर आहेतच. टाटाने 9 वर्षांनी भारतीय बाजारात पुन्हा 10 टक्के वाटा मिळविला आहे. हा मार्केट शेअर कंपनीला टिकवायचा आहे. यामुळे टाटा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. यामुळे कंपनी वर्षाच्या शेवटापर्यंत जवळपास 250 नवीन सेल्स सेंटर उघडणार आहे. 
 

Web Title: Bank of Maharashtra to finance Tata Motors cars; 7.15% interest for farmers, Pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.