मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:56 PM2024-10-03T12:56:49+5:302024-10-03T12:58:32+5:30
मारुतीच्या इको कारला सर्वाधिक लक्ष केले जाऊ लागले आहे. यामुळे कार मालक त्रस्त झाले आहेत. एक पार्ट असा आहे जो चोरांना मालामाल करून टाकत आहे.
चोर कार चोरी करतात, कारचे टायर चोरी करतात हे ऐकले होते. परंतू आता चोरांनी एका विशिष्ट पार्टकडे लक्ष दिले आहे. मारुतीच्या इको कारला सर्वाधिक लक्ष केले जाऊ लागले आहे. यामुळे कार मालक त्रस्त झाले आहेत. एक पार्ट असा आहे जो चोरांना मालामाल करून टाकत आहे.
हा पार्ट सोन्यासारखाच मौल्यवान आहे. या पार्टचे नाव कॅटॅलिक कन्व्हर्टर आहे. या पार्टला सोन्याएवढाच मौल्यवान म्हटले जात आहे. यामध्ये पॅलेडिअम, प्लॅटिनम आणि रोडिअम सारखे धातू वापरण्यात आलेले आहेत. हे धातू खूप मौल्यवान असतात. हे धातू प्रदुषण कमी करण्यासाठी वापरले जातात. याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे.
हा पार्ट काही मिनिटांत काढता येतो. यामुळे कमी वेळेत जास्त पैसे देणारा हा पार्ट असल्याने चोर कोणाची इको कुठे दिसते का हेच पाहत असतात. पाळत ठेवून हा पार्ट काढून नेऊन तो स्क्रॅप डीलरना विकला जात आहे. क्झॉस्ट सिस्टीमला हा पार्ट लावलेला असतो. कार्बन मोनोऑक्साइड (CO), नायट्रोजन ऑक्साईड्स (NOx), आणि हायड्रोकार्बन्स यावर प्रक्रिया करून त्याचे कमी हानीकारक वायूत रुपांतर करण्याचे काम हे मौल्यवान धातू करतात.
- रिडक्शन कॅटॅलिस्ट: ही प्रक्रिया नायट्रोजन ऑक्साईड वायूंचे नायट्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन करते, ज्यामुळे हवेतील नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी होते.
- ऑक्सिडेशन कॅटॅलिस्ट: : कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन्स कार्बन डायऑक्साइड यांचे पाण्यात रूपांतरण केले जाते. यामुळे या वायूंचे हानिकारक प्रभाव कमी होतात.
- ऑक्सिजन स्टोरेज: यात एक सेन्सर आहे जो ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करतो जेणेकरून एक्झॉस्टमध्ये उपस्थित प्रदूषक प्रभावीपणे तोडले जाऊ शकतात.