सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:51 PM2022-06-10T21:51:12+5:302022-06-10T21:52:18+5:30

आम्ही आपल्यासाठी एका अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

Be careful challan of worth 10000 rupees for not giving clean way to ambulances and fire brigade vehicles | सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान

सावधान! या वाहनांना पुढे जाण्यास रस्ता दिला नाही, तर कापलं जाणार 10000 रुपयांचं चलान

Next

रस्त्यावरून वाहनाने प्रवास करत असना वाहतुकीचे नियमही माहीत असायला हवेत. वाहतूक नियमांचे पालन न केल्याने आपले चलानही कापले जाऊ शकते. एवढेच नाही तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याला तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकतो. अनेक वेळा तर, आपल्याला नियमांची माहितीही नसते आणि आपल्याकडून नकळतच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे प्रवास करताना आपल्याला वाहतुकीच्या नियमांची माहितीही असायलाच हवी. आज आम्ही आपल्यासाठी एका अशा वाहतूक नियमाची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे उल्लंघन केल्यास आपल्याला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

इमर्जन्सी वाहनांना मार्ग द्या - 
हा नियम इमर्जन्सी वाहनांना मार्ग देण्यासंदर्भात आहे. सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही मोटार वाहन चालकाने इमर्जन्सी वाहनांना समोर जाण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. अर्थात, जर आपल्या वाहनाच्या मागे एखादे इमर्जन्सी वाहन असेल, तर त्याला समोर जाण्यासाठी तत्काळ रस्ता द्यायला हवा. असे न केल्यास आपले चलान कापले जाऊ शकते. आपल्याला दंडही आकारला जाऊ शकतो. 

इमर्जन्सी वाहने जसे, अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका यांना मार्ग देणे आवश्यक आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत इमर्जन्सी वाहनांना रस्ता न दिल्यास वाहन चालकाला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. हे चलान सुधारित एमव्ही कायदा कलम 194 (ई) अंतर्गत कापले जाते. या कलमात अग्निशमन दल किंवा रुग्णवाहिका यांसारख्या इमर्जन्सी अथवा आपत्कालीन सेवां देणाऱ्या वाहनांना मोकळा रस्त्या न दिल्यास दंडाचा उल्लेख आहे.
 

Web Title: Be careful challan of worth 10000 rupees for not giving clean way to ambulances and fire brigade vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.