कारमधील साधनसामग्रीबाबत चोखंदळ राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:35 PM2017-08-03T13:35:41+5:302017-08-03T13:36:21+5:30

कारमधील साधनसामग्रीबाबत एकदा संबंधित बाजारामध्ये जा. कारमध्ये वेगळे काय, तसेच पर्याय काय आहेत याचा एक वेगळाच आनंद अनुभवाल. कार घेतल्यानंतर त्या कारमध्ये अन्य सीट कव्हर, स्टिअरिंग

Be smart about the car's equipment! | कारमधील साधनसामग्रीबाबत चोखंदळ राहा!

कारमधील साधनसामग्रीबाबत चोखंदळ राहा!

Next

कारमधील साधनसामग्रीबाबत एकदा संबंधित बाजारामध्ये जा. कारमध्ये वेगळे काय, तसेच पर्याय काय आहेत याचा एक वेगळाच आनंद अनुभवाल.
कार घेतल्यानंतर त्या कारमध्ये अन्य सीट कव्हर, स्टिअरिंग कव्हर आदी साधनसामग्री लावण्यासाठी एक शोध सुरू होतो. अनेकदा कंपनीतूनच कारमध्ये अनेक साधने बसवण्यात आलेली असतात. अर्थात कारच्या उच्च श्रेणीमध्ये या साधनांना समाविष्ट करण्यात आलेले असते. सर्वच श्रेणींमध्ये त्या गोष्टी दिलेल्या नसल्याने मग बाजारातून स्वतंत्रपणे त्या वस्तू चॉइसप्रमाणे घेता येतात. काहीवेळा चॉइस हा जास्त महत्त्वाचा वाटतो, त्यामुळेही कंपनी वा शोरूममधून साधने घेण्याचे टाळले जाते. शोरूममध्ये फार पर्याय नसतात, हे ही खरेच आहे. पण उच्च श्रेणीतील म्हणजे एखाद्या मोटारीच्या स्तरीय आवृत्तीत, दिल्या जाणाऱ्या सर्व साधनांचीही काही गरज असतेच असे नाही. पण केवळ आपली कार हाय एंडची आहे हे दाखवण्यासाठी काहीजणांना त्याची भुरळ पडत असते. सांगायचा मुद्दा कार कोणती घेणार हे निश्चित केल्यानंतर अगदी कागद, पेन घेऊन बसा. तुम्हाला काय साधने घ्यायची आहेत ते ठरवा, यादी करा व त्यावर विचार करून बाजारात जाऊन त्या वस्तू स्वतः पाहूनही घ्या. कार घेतल्यानंतर त्यासाठी शोधाशोध व संशोधन करू नका. अनेक वस्तू तुमच्या यादीतून बाजूलाही होतील व नवीन काही वस्तू बाजारात दिसतील, त्या कारमध्ये बसवाव्याशा वाटतील. 
कारमधील साधनसामग्री म्हणजे अक्सेसरीज, इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्या पाहिल्याशिवाय कळणार नाही. शॉपिंगचे वेडही असे असते की काही साधने ही हवीहवीशी वाटत असतात. यी साधनसामग्रीमधील विविधता, पर्याय कंपन्यांच्या उच्चश्रेणीतील कारमध्येही नसतात. त्यामुळे  त्यामध्येही नवीन साधनांचा समावेश होत असतोच. काही साधने नंतर नकोशी वाटतात व ती काढून अन्य पर्यायही शोधले जातात. साधनसामग्रीचे हे महत्त्व अनन्यसाधारण वाटते. आवश्यकता वाटते. अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते साध्या ब्रशपर्यंत असणारी साधने म्हणूनच आकर्षमाचा भाग आहेत पहिल्यांदाच कार घेणाऱ्यांना नव्हे तर दुसरी वा तिसरी कार घेणाऱ्यांनाही याचे आकर्षण आहे, उपयुक्तता वाटावी अशा.या वस्तूंबाबत म्हणूनच पूर्ण यादी करा, प्रत्यक्ष बाजारात जाऊन पाहा. त्यामुळे काही प्रमाणात पैसेही वाचतील व नवे काहीही हाती लागेल.

Web Title: Be smart about the car's equipment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.