Benelli अ‍ॅडव्हेन्चर मोटरसाकल TRK 251 झाली लाँच; केवळ ६ हजारांत बुक करा प्रीमिअम बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 01:43 PM2021-12-17T13:43:21+5:302021-12-17T13:43:44+5:30

Benelli इंडियानं आपली एन्ट्री लेव्हल अ‍ॅडव्हेन्चर मोटरसायकल TRK 251 लाँच केली असून बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे.

Benelli TRK 251 India Launch Price Rs 2 51 Lacs KTM 250 ADV Rival royal enfield | Benelli अ‍ॅडव्हेन्चर मोटरसाकल TRK 251 झाली लाँच; केवळ ६ हजारांत बुक करा प्रीमिअम बाईक

Benelli अ‍ॅडव्हेन्चर मोटरसाकल TRK 251 झाली लाँच; केवळ ६ हजारांत बुक करा प्रीमिअम बाईक

Next

Benelli इंडियानं आपली एन्ट्री लेव्हल अ‍ॅडव्हेन्चर मोटरसायकल TRK 251 नुकतीच लाँच केली. बेनेली इंडियानं TRK 251 या बाईकचं बुकिंग यापूर्वीच सुरू केलं आहे. लवकरच आता ग्राहकांना ही बाईक मिळणार आहे. केवळ 6 हजार रुपये देऊन ग्राहकांना ही बाईक बुक करता येईल. तसंच TRK 251 ही बाईक अनलिमिटेड वॉरंटीसह मिळते.

नव्या TRK 251 मध्ये 250cc फोर स्ट्रोक, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9250 आरपीएमवर 25.8 ची पिक पॉवर आणि 8000 आरपीएमवर 21.1Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकचं इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनसह येतं. या बाईकची स्पर्धा रॉयल एन्फिल्ड हिमालयन आणि KTM 250 Duke सोबत होणार आहे.

नव्या TRK 251 च्या विशेष फीचरबद्दल सांगायचं झालं तर या बाईकमध्ये 18 लिटरची टाकी देण्यात आली आहे, जी टुरिंग क्रेडेन्शिअलच्या दृष्टीनं उत्तम आहे. यामध्ये 170mm ग्राऊंड क्लिअरन्सही देण्यात आलं. TRK 251 ही तीन कलर ऑप्शन्स म्हणजेच ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी ब्लॅक आणि ग्लॉसी ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची एक्स शोरुम दिल्लीची किंमत 2.51 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

"भारतात आपली यंग अॅडव्हेन्चर मशीन लाँच करुन आज आम्हाला आनंद होत आहे, TRK 251 ही एक हाय परफॉर्मन्स असलेली अॅडव्हेन्चर टुरर आहे, जी डिझाईन, अॅग्रेसिव्ह स्टाईल, अल्ट्रा कम्फर्ट एर्गोनॉमिक्स, हाय परफॉर्मन्ससोबत येते. TRK 251 लाँचनंतर आम्ही भारतात बेनेली परिवारात अधिक ग्राहक जोडले जातील अशी अपेक्षा करतो," अशी प्रतिक्रिया बाईक लाँचनंतर बेनेले इंडियाचे एमडी विकास झाबख यांनी दिली.

Web Title: Benelli TRK 251 India Launch Price Rs 2 51 Lacs KTM 250 ADV Rival royal enfield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.