या व्यक्तीने तयार केली आपल्या आवडीची स्टायलिश बाइक, १३ फूट लांब बाइकची किंमत जाणू घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 01:05 PM2018-07-17T13:05:02+5:302018-07-17T13:09:03+5:30
बाइकची लांबी कोणत्याही लक्झरी कार इतकी आहे. जेव्हा ही बाइक बंगळुरूच्या रस्त्यांवर आली तेव्हा सर्वांच्या नजरा या बाइकवर खिळल्या होत्या.
(Image Credit: newstracklive)
गाड्यांचा शौक असणाऱ्यांना पैसे महत्त्वाचे वाटत नाहीत. खिशात जितका पैसा तितकी आलिशान गाडी त्यांना हवी असते. आपल्या या शौकासाठी काही लोक काहीही करतात. बंगळुरुचा असाच एक जाकिर खान नावाचा व्यक्ती काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आलाय. या व्यक्तीने आपला शौक पूर्ण करण्यासाठी चक्क १३ फूट लांब बाइक तयार केली. या बाइकची लांबी कोणत्याही लक्झरी कार इतकी आहे. जेव्हा ही बाइक बंगळुरूच्या रस्त्यांवर आली तेव्हा सर्वांच्या नजरा या बाइकवर खिळल्या होत्या.
कोण आहे जाकिर खान?
व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर जाकिर खान याला बाइक्सची फार आवड आहे. आपला हा शौक पूर्ण करण्यासाठी त्याने १३ फूट लांब बाइक तयार केली. ही बाइक तयार करताना त्याला अनेक अडचणी आल्यात पण त्याने ही बाइक कोणत्याही परिस्थितीत तयार करण्याचा निर्णय घेतला होता. ४५० किलो वजनाच्या या बाइकचं नाव त्याने 'चॉपर बाइक' ठेवलं आहे.
किती दिवसात केली बाइक तयार?
जाकिरने दावा केलाय की, 'ही जगातली आत्तापर्यंतची सर्वात लांब मोटरसायकल आहे. ही एक सीटर बाइक तयार करण्यासाठी त्याला ४५ दिवसांचा वेळ लागला. १२० किमी प्रति तास या स्पीडने चालणाऱ्या या बाइकमध्ये २२० सीसीचं इंजिन लावण्यात आलंय.
किती आला खर्च?
जाकिरने त्याच्या घराजवळील एका वर्कशॉपमध्ये ही बाइक तयार केली असून यासाठी त्याला साडे सात लाख रूपये खर्च आला. या बाइकची रूंदी साडे पाच फूट आहे. तर याचं सायलेन्सर ६ फूटाचं आहे.