Best Mileage Bike: 1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक, किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:38 AM2022-11-06T01:38:35+5:302022-11-06T01:44:44+5:30

ज्या बाईकसंदर्भात आम्ही बोलणार आहोत ती बाईक केवळ मायलेजसाठीच प्रसिद्ध नाही, तर तिचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

Best Mileage Bike tvs sport run 110kmpl, know about the price and features | Best Mileage Bike: 1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक, किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त

Best Mileage Bike: 1 लिटर पेट्रोलमध्ये 110km चालेल ही बाईक, किंमत फक्त 61 हजार रुपये, फीचर्स देखील जबरदस्त

googlenewsNext

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा फटका केवळ कार मालकांच्याच नाही, तर दुचाकीस्वारांनाही बसत आहे. नवी बाईक खरेदी करताना, तिची किंमत आणि फीचर्सशिवाय मायलेजवरही लक्ष जाते. ग्राहकांना चांगले मायलेज देणारी बाइक हवी आहे. अशा स्थितीत जर आपणही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत देशातील सर्वाधिक मायलेज देणारी बाईक. ज्या बाईकसंदर्भात आम्ही बोलणार आहोत ती बाईक केवळ मायलेजसाठीच प्रसिद्ध नाही, तर तिचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

या बाइकचे नाव आहे, TVS Sport. ही भारतीय बाजारातील टीव्हीएसची लोकप्रिय बाईक आहे. एवढेच नाही, तर ही कंपनीची सर्वात स्वस्त मोटारसायकलही आहे. ही बाईक आपल्याला 100kmpl हून अधिकचे मायलेज देईल. याच बरोबर हिची किंमतही फार नाही. 

देईल 110kmpl मायलेज -
टीव्हीएस स्पोर्ट सर्वाधिक मायलेज देणारी बाइक आहे. मायलेजच्या बाबतीत या बाईकचे नाव एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्येही आले आहे. या बाईकने 110kmpl पर्यंत मायलेज ऑफर केले आहे. सध्या या बाईकची किंमत 61,577 रुपयांपासून सुरू होते.

TVS Sport ला 109.7cc चे सिंगल सिलिंडर, 4 स्ट्रोक, फ्यूअल इंजेक्शन, एअर कूल्ड स्पार्क इग्निशन, BS-VI इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6.1kW@7350rpm मॅक्झिमम पॉवर आणि 8.7nm@4500rpm पीक टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकची टॉप स्पीड 90 km/h एवढी आहे. हिची लांबी 1950mm, रुंदी 705mm आणि ऊंचाई 1080 mm एवढी आहे. तसेच हिचे व्हीलबेस 1236 एवढे आहे.

Web Title: Best Mileage Bike tvs sport run 110kmpl, know about the price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.