4 लाख रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये 3 बेस्ट कार, मायलेज 31KM हूनही अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:55 AM2022-06-20T00:55:43+5:302022-06-20T00:57:03+5:30
भारतात हॅचबॅक कार सर्वाधिक विकल्या जातात. किमतीच्या दृष्टाने तर या कार किफायतशीर असतातच, शिवाय लहान कुटुंबासाठीही उत्तम पर्याय असतात.
भारतात हॅचबॅक कार सर्वाधिक विकल्या जातात. किमतीच्या दृष्टाने तर या कार किफायतशीर असतातच, शिवाय लहान कुटुंबासाठीही उत्तम पर्याय असतात. जर आपणही नवीन कार घ्येण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असेल, तर आम्ही आपल्याला 4 लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत येतील अशा खास 3 कारसंदर्भात माहिती देत आहोत.
Maruti Alto -
Maruti Alto ला भारतीय बाजारात जवळपास दोन दशके झाली आहेत. या कारची किंमत 3.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. ही कार CNG पर्यायामध्ये देखील येते. सीएनजीसह कारचे मायलेज 31KM पेक्षाही अधिक आहे. या कारमध्ये टू-टोन डॅशबोर्डसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट किलेस एंट्री आणि फ्रंट डुअल एयरबॅग आहेत.
Maruti Suzuki S-Presso -
या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 67bhp/90Nm टार्क जनरेट करते. अल्टो प्रमाणेच, ही कारही CNG पर्यायातही उपल्ध आहे आणि 31KM हून अधिकचे मायलेज देते. या कारमध्ये, सेंट्रल माउंटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टूडिओसह टचस्क्रीन सिस्टिम, डुअल फ्रंट एअरबॅग, यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विच, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल सारखे फिचर्स आहेत.
Datsun redi-GO -
Datsun redi-GO हॅचबॅकची किंमत 3.83 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारमध्ये 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये LED DRL, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवे डुअल-टोन 14-इंच व्हील कवर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आदी फीचर्स आहेत.