Best Selling 7 Seater: जानेवारीत 'या' 7 Seater कारची बंपर विक्री; किंमत फक्त 5.25 लाख अन् मायलेज 26km

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:53 PM2023-02-17T17:53:00+5:302023-02-17T17:53:26+5:30

Best Selling 7 Seater: या कारने लोकप्रिय Maruti Ertiga ला मागे टाकले आहे.

Best Selling 7 Seater: Bumper sales of maruti eeco 7 Seater car in January; Price only 5.25 lakhs and mileage 26km | Best Selling 7 Seater: जानेवारीत 'या' 7 Seater कारची बंपर विक्री; किंमत फक्त 5.25 लाख अन् मायलेज 26km

Best Selling 7 Seater: जानेवारीत 'या' 7 Seater कारची बंपर विक्री; किंमत फक्त 5.25 लाख अन् मायलेज 26km

googlenewsNext

Maruti Eeco Sales: भारतात SUV सोबत 7 सीटर कारला चांगली मागणी आहे. मारुती सुझुकी अर्टिगा ही डिसेंबर महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली असून, एकूण सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्येही दुसऱ्या क्रमांकावर होती. स्वस्त 7-सीटर कार असल्यामुळे अर्टिगाला चांगली मागणी असते. पण, जानेवारी 2023 मध्ये अर्टिगाच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मारुती एर्टिगा जानेवारीमध्ये टॉप-10 विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीतून बाहेर पडली. त्याची जागा आणखी एका 7 सीटर कारने घेतली आहे.

मारुती सुझुकी Eeco जानेवारी महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी 7 सीटर बनली आहे. जानेवारी 2023 मध्ये, Eeco च्या 11,709 युनिट्सची विक्री झाली आहे. अशा प्रकारे 11% वार्षिक विक्री वाढीसह सर्वोत्तम विक्री होणाऱ्या कारच्या यादीत Eeco नवव्या क्रमांकावर आली आहे. तर Ertiga चे 9750 युनिट्स विकले गेले आणि ती 13 व्या क्रमांकावर पोहोचली.

किंमत आणि फीचर्स
की मारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर लेआउट पर्यायांमध्ये येते. याची किंमत रु. 5.25 लाख ते रु. 6.51 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून, ते 81PS पॉवर आणि 104.4Nm टॉर्क जनरेट करते. याचे एक CNG व्हर्जन आहे, जे 72PS आणि 95Nm निर्मित करतो. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार पेट्रोलवर 19.71 kmpl आणि CNG वर 26.78 kmpl मायलेज देऊ शकते.

या आहेत जानेवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 कार
1. Maruti Suzuki Alto- 18,418 यूनिट विक्री
2. Maruti Suzuki WagonR- 18,398 यूनिट विक्री
3. Maruti Suzuki Swift- 15,193 यूनिट विक्री
4. Maruti Baleno- 16,357 यूनिट विक्री
5. Tata Nexon- 15,567 यूनिट विक्री
6. Hyundai Creta - 15,037 यूनिट विक्री
7. Maruti Brezza - 14,359 यूनिट विक्री
8. Tata Punch - 12,006 यूनिट विक्री
9. Maruti Eeco - 11,709 यूनिट विक्री
10. Maruti Dzire - 11,317 यूनिट विक्री

Web Title: Best Selling 7 Seater: Bumper sales of maruti eeco 7 Seater car in January; Price only 5.25 lakhs and mileage 26km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.