Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:30 PM2022-02-03T16:30:19+5:302022-02-03T16:31:21+5:30

Maruti Wagon R : मारुती सुझुकी इंडिया कंपनीची 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार जानेवारी महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार (Best Selling Car)  ठरली आहे.

best selling cars in january 2022 maruti wagon r tops top 10 list | Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड!

Maruti च्या 'या' कारची बंपर विक्री, जानेवारीत बनवला विक्रीचा रेकॉर्ड!

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची (Maruti Suzuki India) सध्या खूप चर्चेत आहेत. मारुती सुझुकी इंडिया कंपनीची 5 लाख रुपयांची हॅचबॅक कार जानेवारी महिन्यात देशात सर्वाधिक विकली जाणारी कार (Best Selling Car)  ठरली आहे.

Wagon R ची सर्वाधिक विक्री
जानेवारी महिन्यात मारुती वॅगन आर (Maruti Wagon R) ही देशात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये 20,334 वॅगन आर कारची विक्री केली आहे.

Wagon R ची विक्री 18 टक्के वाढली
जर तुम्ही जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीतील Wagon R च्या विक्रीची तुलना केली तर या कारच्या विक्रीत वार्षिक आधारावर 18 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कंपनीने 17,165  Wagon R कारची विक्री केली होती.

डिसेंबरपेक्षा जास्त विक्री
एवढेच नाही तर जानेवारी 2022 मधील  Wagon R कारच्या विक्रीची डिसेंबर 2021 शी तुलना केली तरी ही विक्री वाढली आहे. डिसेंबर 2021 मध्ये  Wagon R कारची विक्री 19,729 युनिट्स होती.

Wagon R चे जबरदस्त मायलेज
Wagon R कारमध्ये, कंपनी 1.0 लिटर आणि 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन ऑप्शन देते. कारचे मायलेज 20 किमी प्रति लिटरपेक्षा जास्त आहे.

CNG मध्ये सुद्धा  Wagon R उपलब्ध
कंपनी  Wagon R कारचे सीएनजी व्हेरिएंट देखील देते. या व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 1 किलो गॅसमध्ये 32.5 किमी मायलेज मिळते.

Wagon R ची किंमत 
देशातील टॉप-10 कारमध्ये मारुतीच्या तीन गाड्या पहिल्या क्रमांकावर आहेत.  Wagon R  नंतर स्विफ्ट आणि डिझायर या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार आहेत.  Wagon R ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 5.18 लाख रूपयांपासून सुरू होते.

Web Title: best selling cars in january 2022 maruti wagon r tops top 10 list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.