Best Selling Cars: पुन्हा एकदा Maruti WagonR ला ग्राहकांची पहिली पसंती; 'या' आहेत टॉप-10 बेस्ट सेलिंग कार्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 04:27 PM2023-05-17T16:27:38+5:302023-05-17T16:36:37+5:30
Best Selling Cars: एप्रिल महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआरला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
Best Selling Cars: एप्रिल महिन्यात Maruti Suzuki WagonR पुन्हा एकदा देशातील ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीची कार बनली आहे. एप्रिलमध्ये मारुती सुझुकी वॅगनआरची सर्वाधिक विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत वॅगनआर पहिल्या क्रमांकावर आहे.
Maruti Suzuki WagonR च्या एप्रिल 2023 मध्ये 20,879 युनिट्सची विक्री झाली आहे. एप्रिल 2022 मध्ये 17,766 युनिट्सची विक्री झाली होती.
Maruti Suzuki Swift च्या एप्रिल 2023 मध्ये 18,753 युनिट्सची विक्री झाली, तर एप्रिल 2022 मध्ये 8,898 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजे, वार्षिक 111% वाढ झाली आहे.
Maruti Suzuki Baleno च्या एप्रिल 2023 मध्ये 16,180 युनिट्सची विक्री झआली आहे, तर एप्रिल 2022 मध्ये 10,983 गाड्यांची विक्री झाली होती. म्हणजेच, वार्षिक 48% वाढ झाली आङे.
Tata Nexon च्या एप्रिल 2023 मध्ये 15,002 युनिट्सची विक्री झाली आहे, तर एप्रिल 2022 मध्ये 13,471 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. वार्षिक 11% वाढ झाली आहे.
Hyundai Creta च्या एप्रिल 2023 मध्ये 14,186 युनिट्स विक्री झाली आहे, तर एप्रिल 2022 मध्ये 12,651 युनिट्सची विक्री झाली होती. वार्षिक आधारावर यात 12% वाढ झाली आहे.
Maruti Suzuki Brezza च्या एप्रिल 2023 मध्ये 11,836 युनिट्सची विक्री झआली होती, तर एप्रिल 2022 मध्ये 11,764 युनिट्स विकल्या गेल्या.
Maruti Suzuki Alto च्या एप्रिल 2023 मध्ये 11,548 युनिट्स विकल्या आहेत तर एप्रिल 2022 मध्ये 10,443 युनिट्सची विक्री झआली आहे. विक्री वार्षिक आधारावर 11% वाढली आहे.
Tata Punch च्या एप्रिल 2023 मध्ये 10,934 युनिट्स विकल्या आहेत तर एप्रिल 2022 मध्ये 10,132 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याची विक्री वार्षिक आधारावर 8% वाढली आहे.
Maruti Suzuki Eeco च्या एप्रिल 2023 मध्ये 10,504 युनिट्स विकल्या आहेत तर एप्रिल 2022 मध्ये 11,154 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. त्याची विक्री वार्षिक आधारावर 6% कमी झाली आहे.
Hyundai Venue च्या एप्रिल 2023 मध्ये 10,342 युनिट्सची विक्री झाली, तर एप्रिल 2022 मध्ये 8,392 युनिट्सची विक्री झाली होती. विक्री वार्षिक आधारावर 23% वाढली आहे.