Best Selling Scooter of India: देशातील सर्वाधिक खपाची स्कूटर कोणती? 30 दिवसांत 2.45 लाख मॉडेलची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:28 PM2021-10-26T17:28:38+5:302021-10-26T17:29:13+5:30

which is the Best selling Scooter of India: पेट्रोल, डिझेल महाग होऊनही वाहन कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका स्कूटरने 30 दिवसांत अडीज लाखांच्या आसपास जबरदस्त विक्री नोंदविली आहे. 

Best selling Scooter of India: Honda Activa records September Sales of 2.45 lakh models in 30 days | Best Selling Scooter of India: देशातील सर्वाधिक खपाची स्कूटर कोणती? 30 दिवसांत 2.45 लाख मॉडेलची विक्री

Best Selling Scooter of India: देशातील सर्वाधिक खपाची स्कूटर कोणती? 30 दिवसांत 2.45 लाख मॉडेलची विक्री

googlenewsNext

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बाजार सुस्त पडला होता. गेल्या दोन महिन्यांपासून सारेकाही उघडल्याने आणि सणासुदीमुळे भारतीय कंपन्यांना सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. पेट्रोल, डिझेल महाग होऊनही वाहन कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच एका स्कूटरने 30 दिवसांत अडीज लाखांच्या आसपास जबरदस्त विक्री नोंदविली आहे. 

Honda Activa (होंडा अॅक्टिवा) स्कूटरची क्रेझ तुफान असल्याचे दिसत आहे. ही स्कूटर देशातील best selling scooter in India बनली आहे. तर देशातील सर्वाधिक खपाच्या दुचाकींमध्ये पहिल्या कमांकावर Hero Splendor (हीरो स्पलेंडर) आणि नंतर Honda Activa चा नंबर लागला आहे. होंडा अॅक्टिव्हाने TVS Jupiter (टीवीएस जुपिटर), Suzuki Access (सुजुकी एक्सेस), Honda Dio (होंडा डिओ), TVS Ntorq (टीवीएस एनटॉर्क), Hero Pleasure (हीरो प्लेजर), Yamaha RayZR और Yamaha Fascino (यामाहा फसीनो) या स्कूटरना मागे टाकले आहे. 

गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये Honda Activa ची 2.45 लाख मॉडेल विकली आहेत. यानंतर TVS Jupiter दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. ज्युपिटरची 56,339 यूनिट्स विकले गेले आहेत. Suzuki Access चे 45,040 युनिट विकले गेले आहेत. अॅक्टिवा सोबत या दोन स्कूटरचे आकडे पाहिले तर दूर दूरवर मागे टाकण्याची शक्यता नाहीय. 

Honda Activa च्या तीन मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये Honda Activa 6G, Honda Activa 125, Honda Activa Anniversary Edition या स्कूटर आहेत. 
 

Web Title: Best selling Scooter of India: Honda Activa records September Sales of 2.45 lakh models in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hondaहोंडा