सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कार; किंमत 15 लाखांच्या खाली, लूक आणि फीचर्सही शानदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:25 AM2023-04-10T10:25:52+5:302023-04-10T16:24:08+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी ह्युंदाई वेर्ना नवीन फीचर्स आणि नवीन लुक-डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन सेडान खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 लाख रुपयांच्या आत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण आम्ही ज्या लोकप्रिय सेदान कारबद्दल सांगत आहोत, त्या देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कार आहेत.
टाटा टिगोर
टाटा टिगोर ही देशातील सर्वात स्वस्त सेडानपैकी एक आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6 लाख 10 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही टाटा टिगोर ही चांगली कार आहे. जर तुमचे बजेट 7 लाखांपर्यंत असेल तर तुम्ही ही कार पर्याय म्हणून निवडू शकता.
ह्युंदाई औरा
ह्युंदाई औरा (Hyundai Aura) ला नुकतेच नवीन अपडेट मिळाले आहेत, यानंतर या कारचा लूक पूर्वीपेक्षा अधिक अॅडव्हान्स झाला आहे. या सेडानची सुरुवातीची किंमत 6 लाख 30 हजार रुपयांपासून सुरू होते. ह्युंदाई कंपनीने या किफायतशीर किमतीत येणाऱ्या सेडानच्या फ्रंट ग्रिल आणि ह्युंदाईच्या बॅजिंगमध्येही बदल केले आहेत.
होंडा अमेज
होंडा अमेज (Honda Amaze) ची किंमत सुमारे 7 लाख रुपयांपासून सुरू होते. ही होंडा कार देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडानच्या यादीत चांगल्या रँकिंगवर येते.
ह्युंदाई वेर्ना
गेल्या काही दिवसांपूर्वी ह्युंदाई वेर्ना नवीन फीचर्स आणि नवीन लुक-डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे. ही कार लाँच होताच सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. नवीन Verna च्या टॉप व्हेरिएंटमध्ये Advanced Driver Assistance System (ADAS) देण्यात आली आहे. या फीचर्समध्ये ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, स्टॉप अँड गो असिस्टसह अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट यांचा समावेश आहे. दुसरीकडे, Creta वर कोणतेही ADAS फीचर दिलेले नाही. कारची एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 10.90 लाख रुपये आहे.