इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 04:15 PM2019-08-06T16:15:18+5:302019-08-06T16:17:42+5:30

सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत.

beware about electric vehicles!; Critical warning of Bharat Ratna award-winning scientist | इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशारा

इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशारा

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी बुलडोझर असल्याचे सांगत 2030 पर्यंत पेट्रोल, डिझेलची वाहने बंद करणार असल्याचे वक्तव्य केले होते. पर्यावरणासाठी ही घोषणा योग्य असली तरीही इलेक्ट्रीक वाहनांच्या तंत्रज्ञानासाठी भारताला दुसऱ्या देशांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. यामुळे भारतरत्न पुरस्कार विजेते वैज्ञानिक सीएनआर राव यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 


सध्याच्या वाहनांमध्ये लिथिअम आयनच्या बॅटरी वापरण्यात येत आहेत. या बॅटरी चीनद्वारे पुरविल्या जात आहेत. सरकारने चीनच्या बहकाव्यात येऊ नये असा इशारा त्यांनी दिला आहे. राव यांच्या म्हणण्यानुसार लिथिअम आयन बॅटरीच्या जागी सोडियम किंवा मॅग्नेशिअम बॅटरी वापरावी. कारण लिथिअम आयनची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे आपल्याला चीनवर मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. बॅटरी मिळत नसल्याने याचा परिणाम त्यांच्या किंमती वाढण्यावर होणार आहे. 


राव हे बंगळुरु येथील जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडवांस सांइटिफिक रिसर्चमध्ये मानद अध्यक्ष आहेत. त्यांच्या दाव्यानुसार लिथिअम आयनचा साठा वेगाने संपुष्टात येत आहे. जगात अन्यत्र कुठेही लिथिअप आढळत नाही. इंडियन इंस्टीटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्लॅटिनम जुबली लेक्चरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी लिथिअम हे ज्वलनशील असून त्याला आग लागली तर ती विझविणे कठीण असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियामध्ये एका शहराला वीज पुरविण्यासाठी फुटबॉल ग्राऊंडच्या आकाराएवढ्या भागावर या बॅटऱ्या जोडण्यात आल्या आहेत. यास आग लागली तर विझविणे अशक्य आहे. याच जागी सोडियमच्या बॅटरी असतील तर त्या विझविता येतील, असेही त्यांनी सांगितले. 


हेलियमही होणार नष्ट
लवकरच सोडियमच्या बॅटरी बाजारात येतील. सध्या सर्वत्र लिथिअम कोबाल्ट बॅटरी वापरल्या जात आहेत. पण लिथिअमचे साठे आहेत कुठे? ते केवळ एका फॅक्टरीतून येत आहे. तर कोबाल्ट कांगोतून येते. मात्र, कांगोवर चीनने ताबा मिळविला आहे. चीनकडे अविश्वसनिय दूरदृष्टी आहे. अर्धा अधिक ऑफ्रिका चीनच्य नियंत्रणात आहे. हेलियम देखील लवकरच संपणार आहे. 

Web Title: beware about electric vehicles!; Critical warning of Bharat Ratna award-winning scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.