BGauss ने लॉन्च केली RUV 350 जबरदस्त स्कूटर, किंमत किती? फिचर्स काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:17 PM2024-06-27T14:17:48+5:302024-06-27T14:19:56+5:30

BGauss कंपनीनं आपली नवी दमदार आणि अत्याधुनिक RUV 350 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

BGauss RUV 350 Launched At 1 10 Lakh Delivery Starts In July | BGauss ने लॉन्च केली RUV 350 जबरदस्त स्कूटर, किंमत किती? फिचर्स काय? जाणून घ्या...

BGauss ने लॉन्च केली RUV 350 जबरदस्त स्कूटर, किंमत किती? फिचर्स काय? जाणून घ्या...

मुंबई-

BGauss कंपनीनं आपली नवी दमदार आणि अत्याधुनिक RUV 350 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर RUV 350i, RUV 350 EX आणि RUV 350 Max अशा तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बेस मॉडलची किंमत १.१० लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी असून कंपनीनं २० हजार रुपयांची प्रास्ताविक सवलत देखील देऊ केली आहे. यात कनेक्टेड टेक, फ्री वॉरंटी आणि फ्री इन्श्यूरन्सचाही समावेश आहे. 

RUV 350EX व्हेरिअंटची किंमत १.२५ लाख आणि टॉप व्हेरिअंट MAX ची किंमत १.३५ लाख रुपये इतकी असणार आहे. RUV 350 ही इलेक्ट्रीक स्कूटर 3kW पावर आणि 165 Nm टॉर्ग जनरेट करते. तर 75kmph इतका टॉप स्पीड या स्कूटरमध्ये मिळतो. स्कूटरमध्ये 3kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यातून एआरएआय सर्टीफाइड 145km इतकी रेंज स्कूटरला मिळते. स्कूटरसोबत 500W चा चार्जर देण्यात येतो. स्कूटर शंभर टक्के चार्ज होण्यासाठी केवळ ५० मिनिटांचा कालावधी लागतो. 

RUV 350 चे दमदार फिचर्स
स्कूटरमध्ये पाच इंचाचा डिजिटल TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात ब्लूटूथ कनेक्टीव्हीटी मिळते. यातून रिअल टाइम माहिती जसं की कॉलिंग, नेव्हिगेशन, लाइव्ह व्हेइकल ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग, डॉक्युमेंट स्टोरेज असे फिचर्स उपबल्ध होतात. 

BGauss RUV 350 स्कूटर ग्राहकांना जुलै महिन्यापासून कंपनीच्या डिलरशीपकडून खरेदी करता येणार आहे. सध्या कंपनीचे पश्चिम आणि दक्षिण भारतात मिळून १०० स्टोअर्स आहेत. ही संख्या यंदाच्या वर्षात २०० पर्यंत नेण्याचा कंपनीचा मानस आहे.

Web Title: BGauss RUV 350 Launched At 1 10 Lakh Delivery Starts In July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.