'मुबारक हो, बाप हुआ है!' Mahindra कडून नवीन एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 06:56 PM2022-05-20T18:56:38+5:302022-05-20T19:13:49+5:30
Mahindra Scorpio N : महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे.
नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राचे Big Daddy of SUVs कोण आहेत? हे आता माहीत झाले आहे. महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे.
महिंद्राची एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) या नावाने बाजारात येणार आहे. नवीन टीझर व्हिडिओमध्ये कंपनीने पहिल्यांदाच कारची संपूर्ण झलक दाखवली आहे. या महिंद्रा कारच्या जाहिरात बॉलीवूडचे बिगबी अमिताभ बच्चन (BigB Amitabh Bachchan) यांचा आवाज आहे. नवीन टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांना 'मुबारक हो, बाप हुआ है!' म्हणताना ऐकू शकता.
नवीन Mahindra Scorpio N चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये (Mahindra Research Valley) तयार करण्यात आली आहे. तसेच, हे डिझाइन मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओमध्ये ( Mahindra India Design Studio) करण्यात आले आहे. कंपनी 27 जून रोजी Mahindra Scorpio N लाँच करणार आहे. त्याच दिवशी कारची किंमत जाहीर होणार असल्याचे समजते.
The name is enough. #BigDaddyOfSUVs
— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) May 20, 2022
Know more: https://t.co/g8nzwE53Ndpic.twitter.com/rPo3V02QrY
नवीन Mahindra Scorpio N चे इंजिन आणि फीचर्सची माहिती अजून समोर आलेली नाही, पण नवीन व्हिडिओ सोबत कारचा लूक समोर आला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प असतील. कारचा लूक अतिशय स्पोर्टी आहे, तर समोरच्या ग्रिलमुळे ते खूप बोल्ड आहे. Mahindra Scorpio N ही महिंद्राच्या नवीन लोगोसह येणारी दुसरी कार असेल. यापूर्वी, कंपनीने महिंद्रा XUV700 मध्ये आपला नवीन लोगो समोर आणला होता.
अनेक फीचर्स पाहायला मिळतील
Mahindra Scorpio N बाबत आणखी काही संकेत देखील समोर आले आहेत. जसे की कारची बॉडी लाइन कर्व्ही आहे. यात स्पोर्टी अलॉय व्हील्स आहेत, जे काहीसे XUV700 सारखे दिसतात. ही डी-सेगमेंटची कार आहे. त्यामुळे यामध्ये पॉवरफुल डिझेल इंजिन मिळू शकते. याचबरोबर, कारचा इनर स्पेस देखील वाढविण्यात आला आहे. यासोबतच अनेक फ्युचरिस्टिक फीचर्सही यात पाहायला मिळतील. याशिवाय, नवीन Mahindra Scorpio N मध्ये तुम्हाला सनरूफ, ऑटोमॅटिक ORVM, छतावरील साइड रेल्स आणि शार्क अँटेना यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. तसे, कारच्या मागील बाजूस ब्रेक लाईट दरवाजाच्या वर देण्यात आला आहे. तर टेल लाइट देखील सी-आकारात असतील.