बजाज ऑटोची मोठी तयारी! CNG वर चालणारी पल्सर लाँच करणार, वाचा कधी येणार बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 11:21 AM2023-09-19T11:21:17+5:302023-09-19T11:21:37+5:30

बजाब आता सीएनजी बाईक लाँच करणार आहे.

Big preparation of Bajaj Auto! CNG powered Pulsar to be launched, read when it will hit the market | बजाज ऑटोची मोठी तयारी! CNG वर चालणारी पल्सर लाँच करणार, वाचा कधी येणार बाजारात

बजाज ऑटोची मोठी तयारी! CNG वर चालणारी पल्सर लाँच करणार, वाचा कधी येणार बाजारात

googlenewsNext

बजाज ऑटो आता दुचाकी उत्पादनात बदल करत आहे, देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या वाहन पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. नवीन बजाज पल्सर रेंज तसेच १०० सीसी सेगमेंटमधील सीएनजी बाइकचे संकेत त्यांनी दिले. राजीव बजाज यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सीएनजी वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती केली आहे.

क्रेटा, सेल्टॉसला टक्कर द्यायला नवीन एसयुव्ही आली; सात सीटरचीही सोय

एका अहवालानुसार, बजाज ऑटो या आर्थिक वर्षात त्यांची पल्सर श्रेणी अपग्रेड करण्याबरोबरच आजपर्यंतची सर्वात मोठी पल्सर बाइक देखील लॉन्च करेल. बजाज ऑटोचे या सेगमेंटमध्ये नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे लक्षात घेऊन कंपनी पल्सर रेंजमधील नवीन मॉडेलसह ६ अपग्रेड्स देण्याची योजना आखत आहे.

बजाज पल्सरने ही बाईक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या बाईकने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेल्या लोकप्रियतेचा फायदा कंपनी अजूनही घेत आहे. आता हेवी इंजिन असलेली नवी बजाज पल्सर सादर करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत राजीव बजाज सांगतात, "आम्हाला वाटते की आमच्याकडे एक चांगले उत्पादन आहे, आणि ते या आर्थिक वर्षात लाँच केले जाईल."

पण कंपनीने अजुन कोणतीही तांत्रिक माहिती शेअर केलेली नाही. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 250cc पर्यंतच्या पल्सर उपलब्ध आहेत. कंपनी ४०० सीसीची बजाज पल्सर लाँच करू शकते. बजाज डोमिनार आधीपासून ४०० सीसी सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. 

या अगोदरही बजाज ऑटोच्या सीएनजी बाईक संदर्भात चर्चा झाल्या होत्या. एप्रिल २००६ मध्ये, राजीव बजाज यांनी सूचित केले होते की कंपनी नवीन उत्पादनावर काम करत आहे. पेट्रोलशिवाय सीएनजीवरही चालणार आहे. या बाईकमध्ये दुहेरी इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता सीएनजी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत असताना बजाज ऑटो सीएनजी बाईकची तयारी करत आहे की काय, या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे.

Web Title: Big preparation of Bajaj Auto! CNG powered Pulsar to be launched, read when it will hit the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.