बाईक टॅक्सीची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:13 PM2017-08-03T20:13:07+5:302017-08-03T20:14:16+5:30

बाईक टॅक्सी हा गोव्यात ब-याच काळापासून सलेला प्रवासी वाहतुकीचा प्रकार भारतात विविध शहरांमध्ये सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. पण हे खरोखरच वाहतुकीचा कोंडमारा झालेल्या शहरांना योग्य आहे की नाही, हा चर्चेचाच विषय होणार आहे.

Bike taxi story | बाईक टॅक्सीची कथा

बाईक टॅक्सीची कथा

Next

केंद्रीय  रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नीतिन गडकरी यांनी अलीकडेच बाईक टॅक्सीस सुरू करण्याची संकल्पना मांडली. देशभरात या प्रकारच्या टॅक्सीमुळे मुंबईसारख्या वाहतुकीच्या वर्दळीच्या शहरात मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर ग्रामीण भागातही त्याचा फायदा होईल.. लोकांना स्वस्त प्रवासाचे साधनही मिळू शकेल. अशा प्रकारची बाईक टॅक्सी भारतामध्ये केवळ एकाच राज्यात होती, ते म्हणजे गोवा राज्य. पर्यटनासाठी समृद्ध असलेल्या गोव्यामध्ये अगदी गोवा केंद्रशासित प्रदेश होते तेव्हापासून या गोव्यातील बाईक टॅक्सीने आपला विश्वास तयार केला आहे. अ्लीकडेच कोलकात्यामध्येही बाईक टॅक्सी सुरू झाली आहे. गोव्यात बाईक टॅक्सी चालवणा-या चालकाला पायलट असे म्हटले जाते. गोव्याप्रमाणेच जगातही अशा प्रकारच्या बाईक टॅक्सी चालवल्या जातात. त्यांचे नियम, परवाने आदी बाबींबाबत चांगलीच सुस्पष्टता तेथे आहे. कंबोडिया, ब्राझिल, कॅमेरून, इंडोनेशिया, नायजेरिया, फिलिपिन्स, स्वीडन, थायलंड, ब्रिटनस व्हिएतनाम, अमेरिका, चीन येथे या बाईक म्हणजे मोटारसायकलीवरून एका प्रवाशाला त्याच्या इप्सित ठिकाणी नेणे व त्याबदल्यात त्याच्याकडून भाडे घेणे. पण हा व्यवसाय इतका प्रभावी आहे की, या प्रकारच्या प्रवसाची ज्याला आवड आहे, गरज आहे, शारिरीकदृष्टीनेही परवडत आहे, एकट्यालाच प्रवासाची आवश्यकता आहे, अशासाठी साधारण चारचाकी टॅक्सी वा रिक्षा करण्याची गरज नसते. त्यांना नक्कीच ही बाईक टॅक्सी फायदेशीर पडेल यात शंका नाही. 
इंडोनेशियामध्ये या बाईक टॅक्सीला ओजेक असे म्हणतात. फिलिपिन्समध्ये या बाईकना साईडकारही असून त्यांना हबल हबल किंवा स्कायलॅब असे नाव आहे. व्हिएतनाममध्ये यांना झेआॅम असे नाव आहे. तर पूर्व आफ्रिकेत बोडा-बोडा असे म्हटले जाते. कंबोडियामध्ये मोटोडॉप्स असे म्हणतात. देशानुसार या बाईक टॅक्सींची नावे, त्या बाईक्सचे प्रकार, कंपनी, या जरी भिन्न असल्या तरी त्यांचा वापर करण्यामागे असलेले फायदे बहुतांशी ठिकाणी सारखेच दिसतात. किमान वर्दळीच्या वा अतिवाहतुकीच्या शहरांमध्ये तरी हा प्रकार उपयुक्त वाटला तरी आधीच वाहतुकीचा झालेला कोंडमारा पाहाता महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये या बाईक टॅक्सी सुरू करणे योग्य ठरू शकेल, त्याचा विचार करण्याची मात्र वेळ नक्कीच आली आहे.

Web Title: Bike taxi story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.