Upcoming Triumph Bike : ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 02:14 PM2023-02-26T14:14:54+5:302023-02-26T14:15:24+5:30
Upcoming Triumph Bike : कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते.
नवी दिल्ली : दुचाकी वाहने बनवणारी कंपनी ट्रायम्फ मोटरसायकल्सने पुढील महिन्यात देशात आपली स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज लॉन्च करणार असल्याचा खुलासा केला आहे. ट्रायम्फने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती शेअर केली आहे. यासंदर्भात कंपनीने 2023 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 लाइन-अपचा टीझर रिलीज केला. कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते.
काय असतील फीचर्स?
ट्रायम्फ देशातील एकमेव स्ट्रीट ट्रिपल आर आणि आरएस आणणार आहे. या मॉडेल्समध्ये फीचर्स म्हणून 'माय ट्रायम्फ कनेक्टिव्हिटी सिस्टम'सह 5.0-इंचाचा टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये नेव्हिगेशन आणि म्युझिकसह इतर अनेक कामे ब्लूटूथ मॉड्यूलद्वारे करता येतात. आर व्हेरिएंटला रेन, रोड, स्पोर्ट आणि कस्टम असे चार राइडिंग मोड मिळतील, तर आरएस व्हेरिएंटला ट्रॅक मोड देखील मिळेल.
765 रेंज असलेले इंजिन
नवीन ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 मध्ये बसवलेले इंजिन 12,000 आरपीएमवर 128 बीएचपीची कमाल पॉवर आणि 9,500 आरपीएमवर 80 एनएम कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसह एक बाय डायरेक्शन क्विकशिफ्टरसह नवीन एक्झॉस्ट असलेला 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
कशी असेल डिझाईन?
या बाइकला अँगुलर डिझाईन देण्यात आले आहे, ज्यामध्ये नवीन ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 मध्ये फ्रंटला बग-आय एलईडी हेडलॅम्प आणि 15-लिटरचे फ्यूल टँक दिसेल. 2023 ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल आर सिल्व्हर आणि व्हाइट या दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. स्ट्रीट ट्रिपल आरएस सिल्व्हर, रेड आणि यलो कलर स्कीममध्ये बाजारात येईल.
केटीएम 890 ड्यूकसोबत होईल स्पर्धा
ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 ची भारतीय बाजारपेठेत केटीएम 890 ड्यूकसोबत टक्कर असेल. ज्यामध्ये 889 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे 115ps/92 Nm आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे.