TATA Electric SUV : ब्लॅक ब्युटी, टाटाच्या या डार्क इलेक्ट्रीक एसयुव्हीवरून नजरही हटणार नाही; रेजही ४५३ किमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:11 PM2023-04-17T18:11:12+5:302023-04-17T18:12:13+5:30
पाहा कोणती आहे ही कार आणि काय आहेत फीचर्स.
टाटा मोटर्सनं (Tata Motors) नेक्सॉन ईव्ही मॅक्सचं (Nexon EV Max) डार्क एडिशन भारतीय बाजारपेठेत लाँच केलं आहे. हे फक्त XZ+ लक्स ट्रिममध्ये ऑफर केले जाईल. नेक्सॉन ईव्ही डार्क एडिशनची (Nexon EV Max Dark Edition) किंमत 19.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि जर एखाद्या ग्राहकाला ते 7.2 kW AC वॉल बॉक्स चार्जरसह खरेदी करायचे असेल, तर त्याला त्यासाठी 19.54 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) भरावे लागेल.
नेक्सॉन ईव्ही मॅक्स डार्क एडिशन मिडनाईट ब्लॅक रंगात उपलब्ध असून त्याचे अलॉय व्हील चारकोल ग्रे कलरमध्ये येतात. पियानो ब्लॅक डॅशबोर्ड आणि ट्राय-ॲरो एलिमेंटसह डार्क थीममध्ये इंटिरिअर देण्यात आलंय. याशिवाय सीट्सना निळ्या स्टिचिंग हायलाइट्स मिळतात. तर दुसरीकडे स्टिअरिंग व्हील निळ्या रंगात लेदरमध्ये देण्यात आले आहे.
कोणते आहेत फीचर्स?
फीचर्सबद्दल सांगायचं झाल्यास यात १०.२५-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. इन्फोटेनमेंट सिस्टम नवीन ईव्ही थीमवर चालेल. यात रियर पार्किंग कॅमेरा, व्हॉईस असिस्टंट आणि व्हॉईस कमांड सारखे फीचर्सदेखील मिळतात. इतर फीचर्समध्ये ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, व्हेंटिलेटेड सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, ऑटो-डिमिंग IRVM आणि इलेक्ट्रीक सनरूफ यांचा समावेश आहे.
४५३ किमीची ड्रायव्हिंग रेंज
टाटाने आपल्या मेकॅनिझ्ममध्ये कोणताही बदल केलेला नाही. नेस्कॉन ईव्ही मॅक्स डार्क एडिशन 40.5 kWh बॅटरी पॅकसह येईल, जी सिंगल चार्जवर 453 किमीची रेंज असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. ही कार 3.3 kW होम AC वॉल बॉक्स चार्जर, 7.2 kW होम AC फास्ट वॉल बॉक्स चार्जर, 15A प्लग पॉइंट आणि DC फास्ट चार्जर वापरून चार्ज केली जाऊ शकते.