BMW ने आणली 'ही' स्वस्त नवी कार, मध्यमवर्गीय ग्राहकही आरामात खरेदी करू शकतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:25 PM2023-09-08T12:25:09+5:302023-09-08T12:25:33+5:30

ही लिमिटेड एडिशन फक्त ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. नवीन मॉडेल 220i M स्पोर्ट प्रो ट्रिमपेक्षा जवळपास 50,000 रुपये जास्त महाग आहे.

bmw 2 series m performance edition launch know its price and features | BMW ने आणली 'ही' स्वस्त नवी कार, मध्यमवर्गीय ग्राहकही आरामात खरेदी करू शकतील!

BMW ने आणली 'ही' स्वस्त नवी कार, मध्यमवर्गीय ग्राहकही आरामात खरेदी करू शकतील!

googlenewsNext

नवी दिल्ली : बीएमडब्ल्यूने (BMW) नवीन BMW 220i M परफॉर्मन्स एडिशन (केवळ पेट्रोल) भारतात 46 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम)  लाँच केली आहे. चेन्नईतील बीएमडब्ल्यू ग्रुपच्या प्लांटमध्ये कारची निर्मिती केली जात आहे. ही लिमिटेड एडिशन फक्त ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. नवीन मॉडेल 220i M स्पोर्ट प्रो ट्रिमपेक्षा जवळपास 50,000 रुपये जास्त महाग आहे.

बीएमडब्ल्यू  2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशन (BMW 2 Series M Performance Edition) ब्लॅक सॅफायर मेटॉलिक पेंटमध्ये उपलब्ध आहे. हे लांब सिल्हूट आणि फ्रेमलेस डोअर्ससह येते. यामध्ये एम परफॉर्मन्स फ्रंट ग्रिल, फॉग लॅम्प इन्सर्ट आणि सेरियम ग्रे कलरचे ORVM आहेत. एलईडी हेडलाइट्स आणि फुल-एलईडी टेल-लाइट्स आहेत. टेललाइट्स रिअरमध्ये मध्यभागी पसरतात. एम परफॉर्मन्स स्टिकर्सला साइड प्रोफाइलवर लावले आहेत.

केबिनच्या आत नवीन बीएमडब्ल्यू  2 सीरीज एम परफॉर्मन्समध्ये पॅनोरामिक ग्लास सनरूफ, अलकेंटरा गीअर सिलेक्टर लीव्हर, एम परफॉर्मन्स डोअर पिन आणि डोअर प्रोजेक्टर, इलेक्ट्रिकल मेमरी फंक्शनसह बीएमडब्ल्यू स्पोर्ट सीट्स, 40/20/40 स्प्लिट रीअर सीट आणि 6 डिम करण्यायोग्य डिझाईनसह एम्बिएंट लाइटिंग मिळते. यामध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 10.25-इंच कंट्रोल डिस्प्ले, बीएमडब्ल्यू हेड-अप डिस्प्ले, बीएमडब्ल्यू जेश्चर टेक्नॉलॉजी, हायफाय लाउडस्पीकर सिस्टम, रियर व्ह्यू कॅमेरासह पार्किंग असिस्टंट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले यासह अनेक फीचर्स आहेत.

कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अटेंटिव्हनेस असिस्ट, ब्रेक असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक व्हीकल इमोबिलायझर आणि क्रॅश सेन्सर्स यांसारखे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत. 
 
बीएमडब्ल्यू  2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशनचे इंजिन 
बीएमडब्ल्यू  2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशनमध्ये 2.0L चार-सिलिंडर ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 1350-4600rpm वर 176bhp आणि 280Nm जनरेट करते. ते केवळ 7.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग वाढवते. यामध्ये 7-स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. स्टीयरिंग व्हीलवर पॅडल शिफ्टर्स देखील आहेत.
 

Web Title: bmw 2 series m performance edition launch know its price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.