BMW Colour Changing Car : BMW नं तयार केली जगातील पहिली रंग बदलणारी कार, तुम्ही पाहिलीत का?; बघा मॅजिक Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:12 PM2022-01-27T16:12:13+5:302022-01-27T16:15:39+5:30
BMW Colour Changing Car : BMW या जर्मन कंपनीनं ऑटो क्षेत्रात मोठा आविष्कार घडवून आणला आहे.
BMW Colour Changing Car : तंत्रज्ञान एवढ्या झपाट्यानं बदलतंय की आज दिसणारे चित्र उद्या तसेच असेल, असा दावा करणे अवघड झाले आहे. त्यात ऑटो क्षेत्रात तर रोज क्रांती होताना दिसतेय. आता तर हवेत उडणारी कार आली आहे. त्यात BMW या जर्मन कंपनीनं ऑटो क्षेत्रात मोठा आविष्कार घडवून आणला आहे. लास वेगास येथे पार पडलेल्या कार्यक्रमात BMW नं रंग बदलणारी कार जगासमोर सादर केली. BMW iX Flow असे या कारला नाव देण्यात आले असून ती electronic ink technologyचा वापर करून तयार केली गेली आहे. सध्या ही कार ग्रे ( राखाडी) आणि सफेद अशा दोनच रंगात बदलताना दिसतेय.
रंग बदलणे हे एवढेच या कारचे वैशिष्ट्य नाही, तर हे रंग बदलण्याचे तंत्रज्ञान ऊर्जा वाचवणारे आहे. स्टेला क्लार्क या BMW ची रिसर्च इंजिनियरने सांगितले की, सूर्यप्रकाशानुसार ही कार तिचा रंग बदलते. जेव्हा प्रचंड गरमी असेल तेव्हा ही गाडी सफेद रंगाची होते आणि थंडी असेल तेव्हा राखाडी रंगाची होऊन, उष्णता शोषून घेतेल.
Expression like you've never seen before 🧘♀️ Change your car's colour to fit your mood with the BMW iX Flow featuring E Ink. #THEiX#BMWCES#BMW#BMWEInk@EInkpic.twitter.com/dSoqbBqJzt
— BMW (@BMW) January 6, 2022
पाहा व्हिडीओ...