देशात पहिल्यांदाच लॉन्च झाली अशी इलेक्ट्रिक स्कूटर; इतक्या किंमतीत Nexon EV खरेदी कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:34 PM2024-07-24T15:34:29+5:302024-07-24T15:38:00+5:30

भारतीय बाजारात आणखी एका कंपनीनं इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. लवकरच ती ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. 

BMW Electric scooter launched for the first time in the country;  Price is enough to buy Nexon EV | देशात पहिल्यांदाच लॉन्च झाली अशी इलेक्ट्रिक स्कूटर; इतक्या किंमतीत Nexon EV खरेदी कराल

देशात पहिल्यांदाच लॉन्च झाली अशी इलेक्ट्रिक स्कूटर; इतक्या किंमतीत Nexon EV खरेदी कराल

जर्मनीची प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू मोटार्डनं आज भारतीय बाजारात त्यांची प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर BMW CE04 लॉन्च केली आहे. या स्कूटरचा लूक आणि डिझाईन इलेक्ट्रिक बाजारात आतापर्यंतच्या इतर बाईकच्या तुलनेनं हटके आहे. आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी पॅकसह या ई बाईकची किंमत पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. 
 
ही देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर असून या किंमतीत तुम्ही Nexon EV सारखी इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकाल. कंपनीनं स्कूटरमध्ये 8.5Kwh क्षमता असणारी बॅटरी दिली आहे जी सिंगल चार्जमध्ये १३० किमी रेंज देईल. त्यात लिक्विड कूल्ड पर्मांनेंट मॅग्नेट इलेक्ट्रिक मोटर आहे जी 42 hp पॉवर आणि 62Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर अवघ्या २.६ सेकंदात ० ते ५० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. या स्कूटरची टॉप स्पीड १२० किमी आहे.

चार्जिंग पर्याय

या स्कूटरसोबत २ चार्जिंग पर्याय दिलेत. एक 2.3kW जो सामान्य चार्जर आहे तर दुसरं 6.9kw चा पर्यायी चार्जर आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर स्टँडर्ड चार्जरने चार्ज केल्यास ४ तास २० मिनिटांत १०० टक्के चार्जिंग होते. तर 6.9kw या मोठ्या चार्जरने चार्ज केल्यास अवघ्या १ तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज केली जाऊ शकते असा कंपनीचा दावा आहे.

काय आहेत फिचर्स?

BMW CE04 ऑल एलईडी लायटिंग, ब्ल्यूटूथ कम्पॅटिबल, १०.२५ इंच टीएफटी डिस्प्ले, किलेस इग्निशन, ३ रायडिंग मोड, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, मेन स्टँड आणि रिवर्स मोडसारखे फिचर्स दिले गेलेत. त्यात तुम्हाला स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सी टाईप यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. त्यात एक वेटिंलेटेड स्टोरेज कम्पार्टमेंट मिळते. त्यासोबत एक डेडिकेटेड लाइटसह माऊंटेड स्टोरेज कम्पार्टमेंटही दिले गेले आहे.

स्टील डबल लूप फ्रेम बेस्ड या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस एक ऑफसेट मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे. या स्कूटरच्या समोरील बाजूस २६५ मिमी डिस्क ब्रेक आहे. मागे सिंगल पिस्टन एक्सियल कॅलिपरसह २६५ मिमी डिस्क ब्रेक आहेत. या स्कूटरमध्ये १५ इंच व्हिल दिलेत. याच्या सीटची उंची ७८० मिमी आहे. जी कमी उंचीच्या लोकांसाठीही उत्तम पर्याय आहे. याचं एकूण वजन २३१ किलो ग्रॅम आहे. या स्कूटरमध्ये सध्या ब्ल्यू आणि व्हाइट हे ऑप्शन देण्यात आले आहेत. 

Web Title: BMW Electric scooter launched for the first time in the country;  Price is enough to buy Nexon EV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.