फॉर्च्युनरपेक्षाही महाग आहे 'ही' बाईक! 3 सेकंदात 100 चा स्पीड, फीचर्स आणि बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 04:13 PM2023-12-24T16:13:39+5:302023-12-24T16:14:35+5:30
कंपनीने ही बाईक स्टँडर्ड आणि कॉम्पिटिशन मॉडेल अशा दोन व्हर्जनमध्ये लाँच केली आहे.
नवी दिल्ली : बीएमडब्ल्यूने (BMW) सुपर बाईक प्रेमींसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. कंपनीने भारतात सर्वात महागडी बाईक BMW M 1000 RR ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने ही बाईक स्टँडर्ड आणि कॉम्पिटिशन मॉडेल अशा दोन व्हर्जनमध्ये लाँच केली आहे.
बाईकच्या स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि कॉम्पिटिशन व्हर्जनची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्ही बाईकची किंमत बघितली तर ही बाईक टोयोटाच्या फॉर्च्युनर एसयूव्हीपेक्षा महाग आहे.
टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलची भारतात किंमत 51.44 लाख रुपये आहे. BMW ची ही बाईक S 1000 RR वर आधारित स्पोर्ट्स बाईक आहे. मात्र, कंपनीने अनेक अपडेट्स आणि डिझाइनमध्ये बदल केल्यानंतर ही बाईक लाँच केली आहे. BMW M 1000 RR ही पूर्णपणे रेसिंग बाईकसारखी दिसते.
बाईकमध्ये 999cc चे शानदार इंजिन
BMW M 1000 RR बद्दल बोलायचे तर कंपनीने या बाईकमध्ये 999cc इनलाइन, 4-सिलिंडर पॉवरफुल इंजिन बसवले आहे, जे 211 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. ही BMW बाईक 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते. गिअरशिफ्टिंग सुलभ करण्यासाठी बाईकला डायरेक्शनल क्विकशिफ्टर देखील देण्यात आले आहे.
बाईकमध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
सुरक्षितता लक्षात घेऊन या बाईकमध्ये ड्युअल चॅनल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, स्लाइड कंट्रोल, 7 राइड मोड्स, लाँच कंट्रोल, व्हीली कंट्रोल, स्टीयरिंग स्टॅबिलायझर, क्रूझ कंट्रोल ड्रॉप सेन्सर आणि हिल स्टार्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
बाईकचा टॉप स्पीड 306 किलोमीटर प्रति तास
या बाईकमध्ये USD फ्रंट फोर्क, मोनोशॉक रिअर सस्पेंशन, फ्रंट व्हीलवर 320 मिमी ड्युअल डिस्क आणि रिअरमध्ये 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक आहे. बाईकचा टॉप स्पीड 306 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच, बाईक केवळ 3.1 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग वाढवते. ही BMW ची एक अनोखी बाईक आहे, जी भारतातील फक्त Ducati Panigale V4R ला टक्कर देऊ शकते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 70 लाख रुपये आहे.