जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच, जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:04 PM2024-05-14T16:04:04+5:302024-05-14T16:04:38+5:30
M 1000 XR बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वात पॉवरफुल टूरिंग बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे.
नवी दिल्ली : बीएमडब्ल्यूने (BMW) जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक M 1000 XR लाँच केली आहे. या बाईकची किंमत 45 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही नवीन बाईक कंपनीची जुनी BMW S 1000 XR बाईक सारखीच असून तिचे अॅडव्हान्स व्हर्जन आहे. M 1000 XR बद्दल बोलायचे झाल्यास ही सर्वात पॉवरफुल टूरिंग बाईक असल्याचा कंपनीचा दावा आहे.
M 1000 XR बाईकचे इंजिन S 1000 RR सुपरबाईकसारखे आहे. या बाईकच्या इंजिनमध्ये कंपनीचे शिफ्टकॅम व्हेरिएबल टाइमिंग/लिफ्ट टेक्नॉलाजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच, बाईक टायटॅनियम व्हॉल्व्हसह, 201 hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. या आउटपुटसह ते सर्वात पॉवरफुल टूरिंग मशीन बनते. यामध्ये मजबूत एक्सीलेरेशनसाठी याला मागील बाजूस मोठे स्प्रॉकेट्स देण्यात आले आहेत, ज्याद्वारे बाईक ताशी 278 किलोमीटरचा वेग गाठू शकते.
M 1000 XR सुपरबाईक क्षमतेसह येते. यात मोठे विंग्सचे सेट, उत्तम रेसिंग स्टाईल, स्पोर्टी इलेक्ट्रॉनिक सस्पेंशन आणि हाय फरफॉर्मेंस एम-ब्रेक्स देण्यात आले आहेत. बाईकची डिसाईन अतिशय स्पोर्टी फील देते. यासोबतच कंफर्ट, प्रॅक्टिकल हँडलबार आणि फूटपेग स्पेसवरही लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये 20 लीटरपर्यंत फ्यूल भरता येते आणि बाईकच्या सीटची उंची 850mm आहे. याशिवाय. बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक रायडर असिस्ट फीचरही देण्यात आले आहे.
This is it: the lightest and most powerful production crossover bike in the world. Nothing less. An M bike through and through. Trimmed down for maximum performance – in this case, long-distance performance.
— BMWMotorrad_IN (@BMWMotorrad_IN) May 13, 2024
Bookings are now open! Secure yours today#M1000XR#BMWM1000XR… pic.twitter.com/6gxB8CQnUU
अॅडव्हान्स फीचर्स
या बाईकमध्ये मल्टिपल रायडिंग मोड्स, पिटलेन स्पीड लिमिटरम लाँच कंट्रोल, रेस अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, हीट ग्रिप्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग आणि क्रूझ कंट्रोल देखील देण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत फक्त M 1000 XR चे स्पर्धात्मक व्हर्जन उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 45 लाख रुपये आहे. या मॉडेलमध्ये कार्बन फायबर व्हील, पॅसेंजर फूटरेस्ट, जीपीएस लॅप टायमर आणि कार्बन फायबर बॉडीवर्क पाहता येईल.