फक्त 3.6 सेकंदात 100 किमी रेंज; BMW F 900 XR भारतात लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:33 PM2022-04-15T16:33:21+5:302022-04-15T16:34:20+5:30
BMW F 900 XR : या बाईकमध्ये शक्तिशाली 895 सीसी, वॉटर-कूल्ड, 4-स्ट्रोक इन-लाइन 2 इंजिन आहे, जे 103 बीएचपी पॉवर आणि 92 एनएन पीक टॉर्क जनरेट करते.
नवी दिल्ली : BMW Motorrad ने भारतीय बाजारात नवीन अॅडव्हेंचर स्पोर्ट-टूरर बाईक BMW F 900 XR लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 12.30 लाख रुपये आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आलेल्या या प्रीमियम बाईकला कंपनीने अनेक बदलांसह सादर केले आहे.
या बाईकमध्ये शक्तिशाली 895 सीसी, वॉटर-कूल्ड, 4-स्ट्रोक इन-लाइन 2 इंजिन आहे, जे 103 बीएचपी पॉवर आणि 92 एनएन पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईक वेगवान आहे आणि केवळ 3.6 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडू शकते, तर तिचा टॉप स्पीड 200 किमी/ताशी आहे.
BMW Motorrad ने नवीन अॅडव्हेंचर बाईक भारतात इंपोर्ट केली आहे, ज्यामुळे तिची किंमत जास्त आहे. या अॅडव्हेंचर बाईकमध्ये हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे.
BMW F 900 XR फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेगाने चालवली जाऊ शकते. ही बाईक वेगवान आणि पॉवरफुल तर आहेच पण दिसायलाही खूप सुंदर आणि आकर्षक आहे. BMW Motorrad ने या बाईकची डिझाइन सुद्धा चांगली केली आहे.