BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 06:27 PM2022-08-04T18:27:36+5:302022-08-04T18:28:30+5:30

BOOM CORBETT 14 : BOOM CORBETT 14 आपल्या स्टायलिश डिझाइन, जास्त रेंज आणि कमी किमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे.

Boom Corbett 14 Electric Moped Claims Range Of 180 Km Know Price And Features Details | BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स...

BOOM CORBETT 14 इलेक्ट्रिक स्कूटरची 180 km रेंज, जाणून घ्या फीचर्स...

Next

नवी दिल्ली : देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक्सची संख्या वेगाने वाढत आहे, याचे कारण म्हणजे वाढती मागणी. या इलेक्ट्रिक टू व्हीलर कमी बजेटमध्ये येतात आणि पेट्रोलचा खर्चाशिवाय जास्त रेंज देतात. इलेक्ट्रिक टू व्हीलर तयार करणारी स्टार्टअप BOOM MOTORS च्या इलेक्ट्रिक मोपेड BOOM CORBETT 14 बाबत सध्या आपण बोलत आहोत. 

BOOM CORBETT 14 आपल्या स्टायलिश डिझाइन, जास्त रेंज आणि कमी किमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. जर तुम्हीही घरगुती किंवा व्यावसायिक वापरासाठी एक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर इलेक्ट्रिक मोपेडची किंमत, रेंज आणि फीचर्सची संपूर्ण डिटेल्सची माहिती जाणून घ्या.

या इलेक्ट्रिक मोपेडची बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनी यामध्ये  4 kWh क्षमता असलेली लिथियम आयन बॅटरी पॅक देत आहे. या बॅटरी पॅकसह कंपनीने 4000 W पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे, जी बीएलडीसी टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या बॅटरी पॅकच्या चार्जिंगबाबत कंपनीने दावा केला आहे की, नॉर्मल चार्जरपासून चार्ज केल्यावर बॅटरी पॅक 2.5 वरून  4 तास फुल चार्ज होतो. 

मोपेडची रेंज आणि स्पीडवरून कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज केल्यानंतरही इलेक्ट्रिक मोपेड 180 किलोमीटरची रेंज देते. या रेंजसोबत 65 किलोमीटर प्रती तासची टॉप स्पीड मिळते.  कंपनीने यामध्ये फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत. यासह अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायरचा कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. 

यामध्ये ब्रेकिंग सिस्टम, चार्जिंग प्वाइंट, डिजिटल क्लॉक, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटन स्टार्ट, मोबाइल अॅप्लिकेशन कनेक्टिव्हिटी, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर, स्वाइप बॅटरी यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने या इलेक्ट्रिक मोपेडची सुरुवातीची किंमत 86,999 रुपयांसह बाजारात आणली आहे, जी टॉप व्हेरियंटवर जाताना 1.20 लाखांपर्यंत जाते.

Web Title: Boom Corbett 14 Electric Moped Claims Range Of 180 Km Know Price And Features Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.